या प्रकरणात 200 हून अधिक सीसीटीव्ही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या एकू १० टीम या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. त्यानंतर या प्रकरणी माहिती देताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.
Ad
salman khan happenings
Image Credit source: ANI
Follow us on
मुंबई – अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर, तातडीने त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. राज्याचे गृहखाते धमकी मिळाल्यानंतर एकदम सक्रिय झाले. सलमान, सलीम खान यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेची टीम सोमवारी सकाळीच सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये दाखल झाली. या प्रकरणात चार जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात सलमान खान, वडील सलीम खान, दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल खान यांचा समावेश आहे.
Statements of actor Salman Khan & his father Salim Khan have been recorded by Mumbai Police after the actor received a threat letter yesterday, June 5. Statements of a total of 4 people have been recorded so far: Mumbai Police
या प्रकरणात 200 हून अधिक सीसीटीव्ही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या एकू १० टीम या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. त्यानंतर या प्रकरणी माहिती देताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. आम्ही अभिनेत्याची भेट घेतली आहे, आणि या प्रकरणाची चौकशी आम्ही करीत आहोत. आत्तापर्यंत या प्रकरणात कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. गरज वाटली तर सुरक्षा अधिक वाढवण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
जबाब नोंदवल्यानंतर सलमान हैदराबादला रवाना
अभिनेता सलमान खान दुपारी तीन वाजताच्या सुमारास हैदराबादला रावाना झाल्याची माहिती आहे. हैदराबाद मध्ये शूटिंगसाठी सलमान खान गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई विमानतळावर व्हीआयपी गेट नंबर 8 वर सलमान दिसल्याची खात्रीलायक माहितीही मिळाली आहे.
सलमान सध्या भयंकर बिझी
सलमान नुकताच अबुधाबीतून IIFA अवॉर्ड्स सोहळा होस्ट करण्यासाठी गेला होता. त्याचशिवाय सध्या त्याचे ‘कभी ईद, कभी दिवाली’ या सिनेमाचे शूटिंगही सुरु आहे. सल्लू टायगर सीरिजच्या तिसऱ्या टायगर-3वरही तो सध्या काम करतोय. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. यासह आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्डा’ आणि शाहरुखच्या ‘पठाण’मध्येही त्याचा गेस्ट एपियरन्स दिसणार आहे.