बागेश्वर बाबाच काय, तुम्ही मनातलं ओळखू शकता? कसा केला जातो हा प्रकार वाचा

| Updated on: May 18, 2023 | 3:59 PM

Bageshwar Dham and suhani shah : एखाद्याच्या मनात काय सुरु आहे, हे ओळखण्याचा दावा बागेश्वर बाबा करत असतात. परंतु मुंबईतील सुहानी शाहने याबाबत काय रहस्य आहे, ते सांगितले. हे कोणालाही शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

बागेश्वर बाबाच काय, तुम्ही मनातलं ओळखू शकता? कसा केला जातो हा प्रकार वाचा
suhani shah mind reader
Follow us on

नवी दिल्ली : बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर धामच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. मुंबईच्या सुहानी शाहने बागेश्वर धामच्या ‘मन की बात’चे रहस्य सांगितले. ‘मन की बात’ ओळखणे ही अद्दश्य शक्ती आहे की ट्रिक हे तिने प्रत्यक्ष करुन दाखवले.

केल्या थेट चाचण्या

मुंबईतील माइंड रीडर सुहानी शाह हिने एका शो दरम्यान प्रेक्षकांसोबत थेट चाचण्या केल्या. शोमध्ये मनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या एका पाटीवर लिहून ठेवत होत्या. मग त्या व्यक्तीला त्याने काय विचार केला होतो, ते विचारुन पाटीवरील उत्तर दाखवत होते. दोन्ही गोष्टी अगदी सेम टू सेम येत होत्या.

हे सुद्धा वाचा

सुहानी काय म्हणते

बागेश्वर धाम जे करतात तेच सुहानी शाह करत आहे. आपल्याजवळ असलेली ही देण एक कला व ट्रिक असल्याचे ती सांगते. मी सराव करुन तिला अधिक विकसित केले आहे. ही कला आपण कोणालाही शिकवण्यास तयार असल्याचे तिने स्पष्ट केले.

माईंड रिंडिंग पॅशन

सुहानी शाह म्हणते, लहानपणापासून माईंड रिडिंगचं मला पॅशन होतं, ते मी पूर्ण केलं, मी पहिलीची शिकली असली, तरी मी या कलेवर पुस्तकं लिहिली आहेत. कारण देशभर फिरत असताना अनेक लोकांशी भेटीगाठी आणि संवाद झाले यात भाषेचं ज्ञान मिळालं. मी माझी इंग्रजी अधिक सुधारण्यावर अजुनही भर देत आहे. भारतात सोशल मीडियावर बाबा धीरेंद्र नंतर सुहानी शाह चर्चेत आली आहे, तिच्या या कलेमुळे.

कोण आहे सुहानी शाह

सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह शो केले आहेत. फक्त पहिलीपर्यंत शिक्षण सुहानीचे झाले आहे. ६० विद्यार्थ्यांसोबत राहण्यापेक्षा ६० हजार लोकांसमोर कार्यक्रम घेण्याचा तिच्या वडिलांनी सल्ला दिला. त्यानंतर शाळा सोडली अन् लाईव्ह शो करुन लोकांचे मन ओळखू लागल्या.