मुंबई : येत्या 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं असा प्रश्न सरकारला पडला आहे. मात्र नुकतंच सरकारसमोर एक पर्याय समोर आला आहे. या पर्यायानुसार विधिमंडळाचे अधिवेशन दीर्घकाळही चालवता येऊ शकतं, असेही बोललं जात आहे. (What is Option for Maharashtra Budget 2021 Presenting during Corona)
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत काल विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य विभागाकडून काही प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पर्यायनुसार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडू शकतं, असं बोललं जात आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अधिवेशनाला हजर राहणाऱ्या आमदार, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार अशा सर्वांची कोरोना चाचणी करायची. एका आठवड्यात सलग चार दिवस अधिवेशनाचे कामकाज चालवायचे. यानंतर तीन दिवस सुट्टी द्यायची.
त्यानंतर अधिवेशनाच्या पुढील आठवड्यात कामकाज सुरु करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांची कोरोना चाचणी करायची. यामुळे जर तीन दिवसांच्या कालावधीत कोणाला कोरोनाची लागण झाली, तर त्यांना अधिवेशनात येण्यापासून रोखता येईल. अशा पद्धतीने आठवड्यातून चार दिवस कामकाज आणि तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युल्यानुसार तीन ते चार आठवडे अधिवेशन चालवता येईल.
दरम्यान काल कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज कसे चालेल यावर देखील चर्चा झाली. अधिवेशनाचे कामकाज हे दोन टप्प्यात होईल. येत्या 25 फेब्रुवारीला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडण्याचं ठरलं आहे. पण अंतिम निर्णय 25 फेब्रुवारीला ठरवला जाईल, असे बोललं जात आहे.
Today, newly 5427 patients have been tested as positive in the state. Also newly 2543 patients have been cured today. Totally 1987804 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 40858.The patient recovery rate in the state is 95.5%.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात काल 5 हजार 427 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज नवीन 2543 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीत एकूण 40 हजार 858 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5 टक्के इतके झाले आहे. (What is Option for Maharashtra Budget 2021 Presenting during Corona)
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह
राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला सादर करणार, अजित पवारांची माहिती
राज्यपालांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनासोबत 12 रिक्त जागांविषयी देखील काळजीने निर्णय घ्यावा : अनिल परब