सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं कारण समोर?

| Updated on: Mar 13, 2021 | 6:51 PM

मनसुख हिरेन प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समुळे खळबळ उडाली आहे. (what is reason behind sachin vaze whatsapp status?)

सचिन वाझे नैराश्यात का?; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं कारण समोर?
25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहोचले. तेव्हा एटीएसच्या अधिकाऱ्याने स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला. त्यावेळी सचिन वाझे सँडविच खात उभे होते.
Follow us on

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समुळे खळबळ उडाली आहे. नैराश्यातून त्यांनी हा स्टेट्स ठेवल्याचं बोललं जात आहे. हिरेन प्रकरणात थेट एटीएसकडून सलग दुसऱ्या दिवशी वाझे यांची चौकशी सुरू आहे. तसेच कोर्टानेही आज त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे या प्रकरणात पाय खोलात गेल्यानेच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आल्याचा स्टेट्स ठेवल्याचं बोललं जात आहे. (what is reason behind sachin vaze whatsapp status?)

एटीएसकडून काल चौकशी

मनसुख हिरेनप्रकरणी काल सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकने तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती वाझेंनी एटीएसला दिली. मात्र, एटीएसने वाझेंना अनेक उलटसुलट प्रश्न विचारले. यावेळी काही प्रश्नांवर त्यांनी समाधानकारक उत्तरं न दिल्याने आजही एटीएसने त्यांना चौकशीसाठी बोलवले होते. सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार असल्याने वाझे काहीसे तणावात होते, असं सूत्रांनी सांगितलं. त्याच बरोबर कोर्टानेही आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे या प्रकरणातून बाहेर पडणं शक्य नसल्याची जाणीव झाली असावी म्हणूनच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज ठेवून त्यांची मनस्थितीच विशद केल्याचंही बोललं जात आहे.

कोर्टाची गंभीर निरीक्षणं

कोर्टाने वाझे यांचा जामीन फेटाळताना गंभीर निरीक्षणं नोंदवली आहेत. ‘त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे’, असं म्हणत कोर्टाने वाझे यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाच्या आदेशाची प्रत टीव्ही 9 ला मिळाली आहे. यामध्ये कोर्टाने सचिन वाझेंबाबत गंभीर नोंदी केल्या आहेत. हा गुन्हा हत्येच्या कलमांतर्गत नोंदवला आहे, असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कट कारस्थान दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एटीएसला वाझेंच्या जबाबात विसंगती आढळल्यास त्यांना अटक करण्याचा एटीएसचा मार्ग मोकळा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोर्टाच्या या गंभीर नोंदी आल्यानंतरच वाझे यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवल्याने त्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वाझेंचा स्टेट्स

3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असं वाझे यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे. (what is reason behind sachin vaze whatsapp status?)

 

संबंधित बातम्या:

कोठडीतील तपासाची गरज, जामीन नाकारताना कोर्टाच्या गंभीर नोंदी, सचिन वाझेंचा पाय खोलात!

आता संयम नाही, जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझे यांचं धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

सचिन वाझेंना निलंबित केलेलं 2004 मधील प्रकरण नेमकं काय, त्यावेळी काय झालं होतं, केस कुठवर आलीय?; निकाल काय लागला?

(what is reason behind sachin vaze whatsapp status?)