सुनिल जाधव, ठाणे, दि.25 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी बुधवारी झाली. तब्बल ११ तास ही चौकशी सुरु होती. आता पुन्हा १ फेब्रुवारी रोजी रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीत काय विचारणा झाली ? त्यासंदर्भात रोहित पवार यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ही चौकशी झाली. या बँकेवर काही राजकीय नेते संचालक होते. त्यांच्याविरोधात 2018 साली अण्णा हजारे आणि इतर काही समाजसेवक न्यायालयात गेले होते. यावेळी काही चुकीच्या गोष्टी राजकीय नेत्यांकडून झाल्या आहेत. या प्रकरणात माझे नाव देखील नाही. त्यानंतर आपण तपास संस्थांना सहकार्य करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
ईडी बँकेच्या या प्रकरणात काही कागदपत्रे हवी होती. ती सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. सर्व प्रकारची मदत आम्ही ईडीला करत आहोत. अधिकारी त्यांचे काम करतात, त्यांना लागणारी सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. तपास संस्थांना सहकार्य करण्याची भूमिका आमची कायम आहे. माझी चौकशी सुरु असताना पवार साहेब स्वतः दहा-अकरा तास होते. यावरूनच साहेब कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात, हे स्पष्ट आहे.
माझी ईडी चौकशी सुरु असताना ईडी कार्यालयाबाहेर हजारो लोक आले. राज्यभरातून आलेल्या लोकांनी मला पांठिबा दिला. जनता आमच्या बाजूने असल्याचे त्यातून समोर येत आहे. महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्वी लढत होतो. तसेच आज पण आणि उद्या पण मी लढणार आहोत.
पवार साहेब मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणून आणि बाप माणूस म्हणून आले होते. आम्हाला काही अडचण आली तर सोडता यावी, यासाठी ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. चौकशी सुरु असताना शरद पवार थोडे चिंतेत होते. तरीसुद्धा कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांनी पाठबळ ते देत होते.
स्वाभिमानी महाराष्ट्रात जे चालले आहे, ते चुकीचे आहे. महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी गुजरात विकास काही लोक करत आहेत. हिच लोक सत्तेत हेत. त्यांना आम्ही आधी विरोध केला आताही करणार आणि उद्याही करणार… असा इशारा रोहित पवार यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दिला.