Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या आमदारकीचे काय होणार? एकनाथ शिंदे गटाचा व्हीप पाळावा लागणार

| Updated on: Jul 04, 2022 | 12:07 AM

असं असलं तरी उद्या बहुमत चाचणी आहे. अशावेळी पक्षानं जारी केलेला व्हीप पाळणं हे आमदारांच कर्तव्य असतं. त्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही, तर आमदारकीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं उद्या काय होते, हे पाहावं लागेल.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या आमदारकीचे काय होणार? एकनाथ शिंदे गटाचा व्हीप पाळावा लागणार
आदित्य ठाकरेंच्या आमदारकीचे काय होणार?
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ शिवसेनेचे गटनेते असतील, असं पत्र विधानभवन सचिवालयानं (Secretariat) दिलंय. भरत गोगावले यांनाही पत्र पाठविलंय. त्यात म्हटलंय की, 22 जूनला पत्र प्राप्त झालं. त्यानुसार एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते आहेत. भरत गोगावले (Bharat Gogwale) हे पक्षाचे प्रतोद आहेत. त्यामुळं यांनी जाहीर केलेले व्हीप पाळणं हे आदित्य ठाकरेंसह इतर शिवसेनेच्या 16 आमदारांना बंधनकारक आहे. अन्यथा या 16 जणांवर कारवाई केली जाऊ शकते. आदित्य ठाकरे व ठाकरेंच्या गटातील 16 आमदारांना भरत गोगावले या प्रदोतांनी जारी केलेला व्हीप पाळावा लागेल. जर त्यांनी तो व्हीप पाळला नाही. तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशावेळी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील 16 आमदारांची आमदाराकी धोक्यात (MLA in danger) येऊ शकते.

ठाकरे गटाला धक्के पे धक्का

अध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना हरली. त्यानंतर आता दुसरा एक धक्का शिवसेनेला मिळालाय. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरींची गटनेते म्हणून मान्यता रद्द करण्यात आली. शिवसेनेच्या गटनेतेपदी आता एकनाथ शिंदे हेच कायम राहणार आहेत. याबाबत विधिमंडळ सचिवालयाच याबबत एक पत्र आलेलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या सुरू असलेल्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का मिळालेला आहे. आधी ठाकरे सरकार गेलं. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला.

ठाकरे गटातील आमदार शिंदे गटाचा व्हीप पाळणार?

खरी शिवसेना कोणती यावरून वाद होता. विधानभवन सचिवालयानं पत्र दिलंय. त्यावरून अजय चौधरी आणि सुनील प्रभू या दोघांचीही नियुक्ती अवैध ठरविण्यात आली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढा देऊ, असं अजय चौधरींनी म्हटलंय. हा लोकशाहीचा खून असल्याची प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली. असं असलं तरी उद्या बहुमत चाचणी आहे. अशावेळी पक्षानं जारी केलेला व्हीप पाळणं हे आमदारांच कर्तव्य असतं. त्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही, तर आमदारकीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं उद्या काय होते, हे पाहावं लागेल.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंसोबत असणारे आमदार

सुनील प्रभू, नितीन देशमुख, राहुल पाटील, संतोष बांगर, वैभव नाईक, सुनील राऊत, रवींद्र वाईकर, भाष्कर जाधव, संजय पोतनीस, अजय चौधरी, दिलीप लांडे, प्रकाश फातेरपेकर, राजन साळवी व कैलास पाटील