सुनील जाधव, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेचा पक्ष आणि निवडणूक चिन्ह गोठविण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी सक्रीय झालेत. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, काहीतरी झालं तरी या चाळीस गद्दारांना निपाद करण्याची ताकद शिवसेनेने (Shiv Sena) तयार केली आहे. हे मुख्यमंत्री कसले औट घटक्याचे. भाजपच्या तालावर नाचणारे हे लोकं आहे. अंधेरी पूर्वची निवडणूक स्वतःच्या जोरावर लढवावी. भाजपच्या भरोशावर हे निवडणूक लढत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
ठाण्याचा वाघ म्हणून राजन विचारे यांचा उल्लेख विनायक राऊत यांनी केला. ठाण्याने गद्दारी कशी करावी हे शिकवले आहे. या ठाण्याला सर्व काही बाळासाहेब यांनी दिलं. या कारट्याला देखील टीळा लावून एबी फॉर्म दिला. नाव न घेता मुख्यमंत्री यांना कारटा म्हणून उल्लेख केला.
एक वाघ आमचा उद्धव ठाकरे आहे. टाळूवरचे लोणी चोरणारे हे गद्दार आहेत. निवडणुकीत आम्ही दाखवणार आहोत. आनंद दिघे यांनी गद्दार यांना दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडला त्या ठिकाणी दारू पिऊन नाचत होते. हैवानाची अवलाद कुठली अशी खरटपट्टीही विनायक राऊत यांनी काढली.
कोणामुळे तुम्ही शिवसेना संपवत आहात. मला सांगण्याची गरज नाही. जन्मदात्या आईचे पाप कुठे फेडणार, असा सवालही विनायक राऊत यांनी विचारला. बाळासाहेबांचे विचार मिटवण्याचे काम आम्ही होऊ देणार नाही.
नारायण राणे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत म्हणाले, लोकांनी दिलेली पदवी कोंबडी चोर. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. तू काय करत होता कोंबडीची पिसे उपटत होता काय. विधानसभेवेळी त्या कारट्याला दाखवली जागा. आता इज्या बिज्या तीज्याला दाखवणार.
त्या आनंद दिघे यांचा सच्चा सेवक अजून दाखवला नाही राजन विचारे यांनी. कोणतेही नाव अंडी निशाणी असो बाळासाहेबाच्या विचार मोडता येणार नाही.
2014 साली जी चूक केली ती आता होणार नाही. वागले, कोपरी, पचपाखाडी आणि ओवला मजीवडा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक उभा करायचा. एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा तो मतदारसंघ आहे, असंही विनायक राऊत म्हणाले.