मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे ‘ते’ 16 आमदार कोण?, संजय राऊत यांचा ‘रोखठोक’मधून सवाल; पडद्यामागे काय चाललंय?

| Updated on: Apr 16, 2023 | 2:13 PM

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीचे 16 आमदारही भाजपसोबत जाऊ शकतात अशी चर्चा असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ते 16 आमदार कोण? असा सवाल केला आहे.

मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे ते 16 आमदार कोण?, संजय राऊत यांचा रोखठोकमधून सवाल; पडद्यामागे काय चाललंय?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यानंतर राज्य सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी 16 आमदारांची जुळवाजुळव भाजपने सुरू केली असून राष्ट्रवादीला यासाठी टार्गेट केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील ते 16 आमदार कोण? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमधून हा सवाल केला आहे. यासाठी त्यांनी हसन मुश्रीफ यांना कसे छळले जात आहे, याचे उदाहरणही दिले.

संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील फोडला आहे. तसेच राज्यात पडद्यामागं काय चाललं आहे, याची माहितीही उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांच्यावर टांगती तलवार

शिंदे गटाने 40 आमदार फोडून सरकार स्थापन केलं. आता त्यातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे आमदार अपात्र झाल्यावर सरकार कोसळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तेवढेच आमदार फोडून सत्ता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईडी आणि सीबीआयच्या मदतीने राष्ट्रवादीचे 16 आमदार फोडण्याचं कारस्थान पडद्यामागं चाललं आहे. त्यामुळेच ज्या आमदारांवर या ना त्या कारणाने खटले सुरू आहे, त्यांना धमकावण्याचं काम सुरू आहे. ते 16 आमदार कोण आहेत? असा सवाल करतानाच हसन मुश्रीफ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांना जेरीस आणलं जात आहे. मुश्रीफ यांनी भाजपमध्ये जाण्यासाठीचा हा खटाटोप आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

कुणालाच तुरुंगात जायचे नाही

मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत. पण कुणालाच तुरुंगात जायचं नाहीये. एकनाथ शिंदे यांनाही तुरुंगात जायचं नव्हतं. त्यामुळे ते भाजपसोबत गेले. बेईमानांचे सरदार झाले, असा हल्लाही त्यांनी चढवला आहे. याचवेळी राऊत यांनी पवार आणि ठाकरे भेटीतील तपशीलही उघड केला आहे.

सभ्य लोकांचे राजकारण नाही

ईडीच्या दबावाने आमदारांना फोडणे हे सभ्य लोकांचे राजकारण नाही. शरद पवारांनी या भेटीत एक चांगला मुद्दा मांडला. जे लोक भीतीने पक्ष सोडत आहेत, ते भाजपमध्ये गेल्याने टेबलावरची फाईल फार तर कपाटात जाईल. पण ईडी-सीबीआयची फाईल कधीच बंद होत नाही, असं पवारांनी सांगितल्याचं राऊत म्हणाले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या किती फायली कपाटात जातात हे पाहायचे आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.