मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं (BMC election 2022)रणशिंग फुकलं गेलं आहे. शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या सैन्याची जमवाजमव सुरु झालेली आहे. कसेही करुन यावेळी मुंबई महापालिका ताब्यात मिळवायचीच असा चंग दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाधलेला आहे. वरिष्ठ नेतेही तयारीला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)नगरसेवक, विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन तयारीला लागा, प्रभागांत फिरा असे सांगत आहेत. शिवसेनेचे संघटन मुंबईत चांगले असल्याने मुंबई महापालिका पुन्हा जिंकणारच असा विश्वास शिवसेनेला आहे. तर भाजपानेही 2017 च्या महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर यंदा मैदानात उतरलेल्या सैन्याच्या आणि नेत्यांच्या मनात आत्मविश्वास दांडगा आहे. गेल्या वेळेप्रमाणे या निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार (Ashish Shelar)यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. यावेळी भाजपाचाच महापौर मुंबई महापालिकेत बसणार असा निर्धार व्यक्त करण्यात येतो आहे. या चुरशीच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. यातच उच्चभ्रूंचा वॉर्ड अशी ओळख असलेल्या 214 क्रमांकाच्या वॉर्डात यावेळी काय होणार याची उत्सुकताही सगळ्यांना आहे. पेडर रोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात भाजपाचा विजयी अश्व रोखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.
214 क्रमाकांच्या या प्रभागात महालक्ष्मी मंदिर, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटल, ताडदेव, गोवालिया टँक, जनता नगर हे महत्त्वाचे भाग येतात. उत्तरकेडे समुद्र किनारा, पूर्वेकडे जाजजी दादाडी मार्ग आणि पंडित मदनमोहन मालवीय मार्ग तर दक्षिणेकडे ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 60236 इतकी असून, यात एससी 1839 तर एसटी 217 जण आहेत.
2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून 9 जण रिंगणात होते. त्यापैकी 5 जण अपक्ष होते. शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपाकडून सरीता पाटील, काँग्रेसकडून कौशिक शहा, मनसेकडून धनराज नाईक हे रिंगणात होते. राष्ट्रावादीचा या ठिकाणी अधिकृत उमेदवार नव्हता.
2017 साली सरीता पाटील या भाजपाच्या नगरसेविका होत्या.
2017 च्या मुंबई महापलिका निवडणुकीत एकूण 26436 मतांपैकी 13859 मते ही भाजपाच्या सरीता पाटील यांना पडली होती. शिवसेनेच्या अरविंद बने यांना 8393 मते पडली होती. ते दुसऱ्या स्थानी होते. काँग्रेसच्या कौशिक शहा यांना 2668 मते मिळाली होती. यंदा भाजपाच्या उमेदवाराची मतसंख्या कमी करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.
राजकीय पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस |