मुंबई – मुंबई महापालिकेच्या (BMC election 2022)यंदाच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात हा सामना रंगणार असला तरी संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे असणार आहे. शिवसेनेतील (Shivsena)बंडाळीनंतरची ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे, हे नक्की. मराठी माणूस आणि मुंबईकर यांचे शिवसेनेची वेगळे नाते आहे. यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेच्या किती पाठिशी आहे, हे स्पष्ट होणार आहे. तसेच ही निवडणूक शिवसेना महाविकास आघाडीत एकत्र लढणार का, काँग्रेसची भूमिका काय असणार याकडेही सगळ्यांचे लक्ष असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS)भाजपाला पूरक भूमिका घेणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 22 मध्येही यंदाची निवडणूक ही चुरशीची मानण्यात येते आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपाने सरशी मिळवली होती, यंदाच्य़ा निवडणुकीत शिवसेना हे आव्हान पेलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
पारेख नगर, सुंदरपाडा, कांदिवली गावठाण पोईसर जिमखाना असे भाग मिळून हा प्रभाग आहे. विशेष करुन या भागातील मराठी मते कुणाला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. गेल्या निवडणुकीत हा प्रभाग महिला ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या प्रभागाच्या पूर्वेकडे पश्चिम रेल्वे आहे. तर उत्तरेकडे एमजी ओरड मथुरादास रोड आहेत. पश्चिमेकडे नाला आणि दामूअण्णा दाते रस्त्यापर्यंत हा प्रभग पसरेला आहे. या प्रभागातील एकूण लोकसंख्या ही 57643 इतकी असून यात 1299 एससी आणि 883 एसटी लोकसंख्या आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत या ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात होते. भाजपाच्या प्रियंका मोरे, काँग्रेसच्या नीलम मधाळे, मनसेच्या पायल घाडी, राष्ट्रवादीच्या मानवाचार्य पूजा कुणाल आणि शिवसेनेच्या सुवर्णा प्रसादे या रिंगणात होत्या. यात भाजपाच्या प्रियंका मोरे यांनी विजय मिळवला होता.
वॉर्ड क्रमांक 22 मधून 2017 साली भाजपाच्या प्रियंका मोरे यांनी विजय मिळवला होता.
2017 च्या निवडणुकीत एकूण 23957 मतांपैकी प्रियंका मोरे यांना 14570 मते मिळाली होती. शिवसेनेच्या सुवर्णा प्रसादे यांना 4313 , मनसेच्या पायल घाडी यांना 806 , काँग्रेसच्या निलम मधाळे यांना 2624 , तर राष्ट्रवादीच्या पूजा मन्वाचार्य यांना 1183 मते मिळाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची मते एकत्र आली तरी या ठिकाणी भाजपाला मात देणे सध्या तरी अवघड दिसते आहे. मात्र राजकीय गणिते काय असतील यावर सगळ्या बाबी ठरणार आहेत.
पक्षाचे नाव | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी |