BMC election 2022 Ward 92 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 92 मध्ये कोण मारणार बाजी? बीकेसीत चुरशीची लढत होणार

| Updated on: Aug 20, 2022 | 7:44 PM

वॉर्ड क्रमांक 92 बीकेसी प्रभागाकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. य़ा ठिकाणी गेल्या वेळी 16 उमेदवार रिंगणात होते. यावेळी भाजपा आणि मनसे एकत्र आल्यास त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

BMC election 2022 Ward 92 - मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 92 मध्ये कोण मारणार बाजी? बीकेसीत चुरशीची लढत होणार
चुरशीची लढत रंगणार
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

मुंबई – राज्यातील सत्तांतर त्यानंतर सत्तेत आलेला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गट आणि भाजपा (BJP)यांच्यासाठी आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेष म्हत्त्वाच्या आहेत. या निवडणुकीत दमदार विजय मिळवत शिवसेनेचे मुंबईतील राजकीय वर्चस्व संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. तर एकनाथ शिंदे गटही यासाठी भाजपाला बळ देण्याची शक्यता आहे. शिवसेनेत (Shivsena)झालेल्या बंडाळीनंतर मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असल्याने मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठीही प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबईत शिवसेनेचे संघटनही मजबूत असल्याने या निवडणुकीत पारडं नेमकं कुणाच्या पारड्यात जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या जवळ असलेल्या वॉर्ड क्रमांक 92 बीकेसी प्रभागाकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. य़ा ठिकाणी गेल्या वेळी 16 उमेदवार रिंगणात होते. यावेळी भाजपा आणि मनसे एकत्र आल्यास त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

कसा आहे वॉर्ड क्रमांक 92 ?

बीकेसी अशी ओळख असलेल्या या वॉर्डमध्ये बीकेसी, एमएमआरडीए ग्राऊंड, ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर हे महत्त्वाचे भाग आहेत. उत्तरेकडे भारत नगर, बीकेसी रोड ते पश्चिमेकडे ज्ञानेश्वर नगर, वाकोला नाला असा हा परिसर आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ही 52951 इतकी आहे. त्यात एससी 2405  तर एसटी 434 जण आहेत.

2017 च्या निवडणुकीत कोण रिंगणात?

मुंबई महापालिकेच्या 2017  साली झालेल्या निवडणुकीत या प्रभागातून 16 उमेदवार रिंगणात होते. यात सहा अपक्ष होते. भाजपाकडून शीतल मंगवाना, शिवसेनेकडून रुपाली शिंदे, मनसेकडून मजीदुन्निसा खान, सपाकडून शबीना अर्शद, काँग्रेसकडून मेमन युसुफ, राष्ट्रवादीकडून नेहा पाटील, एमआयएमकडून गुलजान कुरेशी बविआकडून मेहरुनीसा शेख हे रिंगणात होते.

हे सुद्धा वाचा

विजयी उमेदवार 2017

एमआयएमच्या गुलनाज कुरेशी या नगरसेविका

यंदा काय होण्याची शक्यता?

2017 साली या प्रभागात 16 उमेदवार रिंगणात असल्याचे ही निवडणूक चुरशीची झाली होती. एमआयएमच्या गुलनाज कुरेशी यांना 4882 मते पडली होती. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या मेमन युसुफ 3538, भाजपाच्या शीतल मंगवाना यांना 2532 तर मनसेच्या मजीदुन्नीसा यांना 2236 मते मिळाली होती. भाजपा आणि मनसे एकत्र आल्यास या ठिकाणी त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

राजकीय पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस