असं काय आहे की 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळत नाहीय? वाचा 5 कारणे

| Updated on: Oct 20, 2021 | 3:35 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. (why Aryan Khan Denied Bail by Special Court?)

असं काय आहे की 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळत नाहीय? वाचा 5 कारणे
aryan khan
Follow us on

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा आज पुन्हा जामीन फेटाळाल गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला 13 दिवसानंतरही जामीन का मिळत नाही? त्यामागची कारणे काय आहेत? त्यावर टाकलेला प्रकाश.

पहिलं कारण: आर्यन रेग्युलर ग्राहक

आर्यन खान विरोधात एनसीबीकडे सज्जड पुरावे असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यासाठी एनसीबीने काही कारणं कोर्टापुढे मांडली आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्यन खान हा नियमित ड्रग्ज घेत होता. तो ड्रग्ज घेणारा नियमित ग्राहक होता. अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज सापडलं. तेव्हा आर्यनही त्याच क्रुझवर होता.

दुसरं कारण: व्हॉट्सअॅप चॅटने गोत्यात

ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचा तपास करण्यात आला असता त्यात ड्रग्ज रॅकेटशी संबंधित अनेक बाबी एनसीबीला आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं. एका नवोदित अभिनेत्रीसोबतचे आर्यनचे चॅटही एनसीबीच्या हाती लागले आहेत,. त्यातही ड्रग्जवर तो चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेही त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तिसरं कारण: आंतरराष्ट्रीय कनेक्शन

आर्यनचे इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलर्ससोबत कनेक्शन असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला आहे. त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. त्याचा अधिक तपास करायचा असल्याने आर्यनला सोडू नये असं एनसीबीचं म्हणणं आहे.

चौथं कारण: पुरावा नष्ट होण्याची भीती

आर्यनचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ड पेडलर्स सोबत कनेक्शन आहेत. तो बाहेर आल्यास पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी मागणी एनसीबीने केली होती.

पाचवं कारण: संपूर्ण कटात सहभाग

आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. त्यामुळे त्याची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली होती. त्यामुळेच कोर्टाने आर्यनची जामीन याचिका फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आर्यन खानचा मुक्काम कोठडीत कसा वाढत गेला ?

2 ऑक्टोबर – आर्यन खानला अटक, एक दिवसाची कोठडी

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता. त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती.

4 ऑक्टोबर – तीन दिवसांची एनसीबी कोठडी

एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आर्यन खान तसेच त्याच्या इतर साथीदारांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीत एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती.

7 ऑक्टोबर – 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

तीन दिवसांची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने आर्यन खानसह इतर सात आरोपींना 7 ऑक्टोबर रोजी तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली होती. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली होती. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला होता.

14 ऑक्टोबर – न्यायालयाने निकाल राखून ठेवला

14 ऑक्टोबर रोजी आर्यन खान, मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना एनडीपीएस मुंबई कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. पण न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

20 ऑक्टोबर – आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला

एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकरणावर सुनावणी घेतली. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळून लावला आहे.

 

संबंधित बातम्या:

Video: जुते दो, पैसे लो म्हणत, मेव्हणीची दाजींकडे चक्क 21 लाखांची मागणी, पाहा लग्नातील भन्नाट किस्सा

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार अमिषा पटेल-सनी देओलची जोडी, लवकर होणार मोठी घोषणा!

‘Money Heist Season 5’च्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रदर्शित, प्रोफेसरच्या खेळीवर खिळल्यात सर्वांच्या नजरा!

(why Aryan Khan Denied Bail by Special Court?)