मुंबई: काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा बाळासाहेब थोरात यांच्याकडेच ठेवली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षपदाची अद्यापही घोषणा केलेली नाही. एका व्यक्तीकडे दोन पदे नसावेत असे संकेत असतानाही थोरात यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून आगामी काळात तरी त्यात काही बदल होणार नसल्याचं चित्रं दिसत असून त्याविषयीचा घेतलेला हा आढावा. (why congress not changed maharashtra congress president?)
अनुभवी थोरात
थोरात हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. शिवाय ग्रामीण भागातील त्यांची जाण चांगली असून कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संवाद आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांच्याकडेच हे पद कायम ठेवण्यात आलं असावं असं राजकीय विश्लेषक सांगतात.
स्पर्धक नाही, आक्षेप नाही
थोरात यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक अशी आहे. भाजपच्या झंझावातातही त्यांनी राज्यातील पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. अनेक नेत्यांना भाजपमधून जाण्यापासून रोखले. त्यांच्या कार्यशैलीवर अजूनही कोणत्याही नेत्याने आक्षेप घेतलेला नाही. पक्षात प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणीही त्यांच्या स्पर्धेत नाही किंवा कुणीही प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी हायकमांडकडे इच्छा दर्शवलेली नाही, त्यामुळे सुद्धा थोरात यांच्याकडे पक्षाध्यक्षपद देण्याकडे पक्षाला पर्याय नव्हता, असं सांगितलं जात आहे.
पृथ्वीबाबा, अशोक चव्हाणांचा नकार
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष होण्यासाठी नकार दिल्याचं सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडे प्रदेशाध्यक्षपद सांभाळू शकेल असा मोठा नाहीये. विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांना राजकीय मर्यादा आहेत. तर माणिकराव ठाकरे हे सुद्धा पुन्हा प्रदेशाध्यक्ष होण्यास इच्छूक नसल्याने तूर्तास तरी पक्षाकडे थोरात यांच्याशिवाय पर्याय नसल्याचंही सांगण्यात येतं.
राष्ट्रवादी, शिवसेनेशी सुसंवाद
बाळासाहेब थोरात यांचे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. या दोन्ही पक्षात थोरात यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळेही पक्षाचा गाडा हाकण्यास ते योग्य असल्याचंही सांगण्यात येतं.
विखे-पाटलांना शह
नगर जिल्ह्यात भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं प्रस्थ आहे. विखे-पाटील भाजपमध्ये गेल्याने नगर जिल्ह्यात भाजपचे प्रस्थ वाढू नये म्हणून काँग्रेसने कंबर कसली आहे. थोरात यांना नगर जिल्ह्याची खडा न् खडा माहिती असल्याने ते विखे-पाटलांच्या झंझावाताला रोखू शकतात, शिवाय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरही नगर जिल्ह्यात त्यांनी काँग्रेसमध्ये पडझड होऊ दिली नाही. त्यामुळेही त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवण्यात आलं असावं, असं राजकीय विश्लेषक सांगतात. (why congress not changed maharashtra congress president?)
चार राज्यांमध्ये संघटनात्मक बदल
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराज नेत्यांशी बैठक घेतल्यानंतर तेलंगना, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला नवा अध्यक्ष देऊन त्यांनी हे बदल करण्यास सुरुवात केली असून राज्य कार्यकारिणीतही आणखी बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. (why congress not changed maharashtra congress president?)
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 December 2020https://t.co/di6KMwNavA
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
संबंधित बातम्या:
शिवसेना-राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांचा सन्मान, काँग्रेसने वचन का नाही पाळलं? घटकपक्षाची खंत
बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?
केंद्रीय पथक महाराष्ट्रात; ‘या’ जिल्ह्यांतील नुकसानीची पाहणी करणार
(why congress not changed maharashtra congress president?)