मी राजकारणी नाहीये, मला इतरांप्रमाणे नाही वागता येणार, असं का म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Nov 11, 2024 | 5:29 PM

राज ठाकरे यांनी टीव्ही ९ मराठीला खास मुलाखत दिली. राज ठाकरे यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर टीका केली. याशिवाय अजित पवारांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, मी इतरांच्या सारखा राजकीय नेता नाही.

मी राजकारणी नाहीये, मला इतरांप्रमाणे नाही वागता येणार, असं का म्हणाले राज ठाकरे
raj thackeray
Follow us on

 

राज ठाकरे यांनी टीव्ही ९ मराठीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. राज ठाकरे म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तीने चुकीची गोष्ट केली तर त्याला चुकीचीच म्हणणार. संबंध असले तरी भूमिका पटली नाही. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत मी जे केलं तर गुड जेश्चर म्हणून केलं. लोकसभेला पाठिंबा बिनशर्त दिला होता. विधानसभेला मदत करा अशी शर्तच नव्हती. मी मोदींना पाठिंबा दिला होता. अमित ठाकरे यांचा विषय आता आला. हा विषय संबंधाचा आहे. अमित ठाकरे यांचं नाव जाहीर केलं. त्यांना मी विचारलं नाही. तुम्ही उमेदवार द्या नाहीतर नका टाकू. ते भेटायला आले होते. मी काय करु भेटून. तुम्ही जे करणार आहात ते करणार आहात.’

‘एखाद्या व्यक्तीचं निधन होते तेव्हा तिथे आम्ही उमेदवार देत नाही. मी काही गोष्ट पाळतो. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीने पाळावा अशी माझी अपेक्षा नाही. शिंदेंची ही पहिली निवडणूक आहे माझी ही चौथी निवडणूक आहे. यात चर्चा काय करायची होती. विषय आता संपला आहे आता चर्चा काय करायची.’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘युतीचं सरकार असं मला वाटतं. फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. याचे संकेत अमित शाह यांनी ही दिले. एकमेकांचे या लोकांनी किती वाभाडे काढले. टोकाला जाईपर्यंत वाभाडे काढले. भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल असं मला वाटतं. माझा कन्फर्ट झोन हा भाजपसोबत आहे. शिवसेनेत असताना माझा भाजपसोबत माझा संबंध आला.’

‘अमित शाह म्हणाले होते की, आज मुख्यमंत्री जरी शिंदे असले तरी पुढचा निर्णय महायुतीचे निर्णय घेतील. मला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या मी बोलतो. अजित पवार यांची पक्ष फोडला. मी तसं नाही केलं. मी बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम करु शकत नाही. मी इथिक्स पाळली. मी तसा विचार करतो. बाकीच्यांच्या तराजूत मला तोलू नका. असं राज ठाकरे म्हणाले.