बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले

| Updated on: Sep 21, 2024 | 8:37 PM

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत चाललेल्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये. फक्त मतांसाठी राजकारण सुरु आहे. शहरांची वाट लागली आहे. पैसा हा फक्त बाहेरुन येणाऱ्या लोकांना सुविधा पुरवण्यासाठी खर्च केला जात आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचं, राज ठाकरे कडाडले
Follow us on

वरळी व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि विरोधक दोघांवर टीका केली आहे. मराठी माणसांच्या हातातून मुंबई जातेय हे त्यांनी पुन्हा एकदा लक्षात आणून दिलं. राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे डेव्हल्पमेंट प्लान होतं. पण टाऊन प्लानिंग होत नाही. आपल्याकडे किती लोकसंख्या वाढणार, तेवढे रस्ते आहे का, कॉलेज, ‘हॉस्पिटल येणार का, मार्केट येणार आहे का, थिएटर येणार का याचा विचार केला जात नाही. आम्ही त्याचा विचार करत नाही. आपण फक्त स्क्वेअर फुटात अडकलोय. राहिल्या आल्यानंतर जगायचं कसं याचे प्रश्न विचारतो का. आम्हीच प्रश्न विचारत नाही. तुमची स्वतची हक्काची जमीन समोरच्याला देत असताना तुम्ही प्रश्न विचारत नाही. हेच त्यांना हवं असतं. बिल्डर सारख्या औलादींना हवं असतं. तुमच्यात जेवढी फुट पडेल तेवढं त्यांना हवंच असतं. राजकारणी आहेच बसलेले. तुम्ही एकत्र राहणं, विचार करणं गरजेचं आहे. एकमुखाने विचार करून बोलणं महत्त्वाचं आहे. तर हाताला काही गोष्टी लागतील.’

‘प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. लाल बस ही मुंबईची ओळख होती. आज कोणत्याही शहराला कॅरेक्टर उरलेलं नाही. सगळीकडे फ्लायओव्हक आणि ब्रिज होताय. पण हे कोणासाठी आणि का होतंय. माणसं वाढायला लागलीये. बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहेत. मुंबई वाढत जातेय. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी पैसा खर्च होतोय. मुळ जिथे खर्च व्हायला पाहिजे तिथे न होता पैसा खर्च होतोय.’

‘ठाणे जिल्ह्यात बाहेरचे लोकं येत आहेत. एकाच जिल्ह्यात आठ महापालिका आहे. बाहेरच्या लोकांनी आम्ही का कड्यावर घ्यायचं. राजकारणात कशाला मग यायचं. मुळ गोष्टीकडे कोणाचं लक्षच जात नाही. बदलापूरमधील घटना आपल्याच लोकांनी बाहेर काढलं. नाहीतर बाहेरपण आलं नसतं. दरवर्षी या महाराष्ट्रात ३ ते ४ हजार बलात्कार होत आहेत. हा सरकारी आकडा सांगतोय. यावर इलाज कोणी शोधायला तयार नाही. फक्त टीका करायच्या. शाळेत लहान मुली पाठवायच्या आणि असे प्रकार घडणार.’