माझे पती अजून बेपत्ता आहेत, सापडेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवा; अभियंत्याच्या पत्नीचा टाहो

| Updated on: May 25, 2021 | 7:16 PM

तोक्ते चक्रवीदाळात बार्ज पी 305 हे जहाज बुडून आठवडा होत आला आहे. अजूनही अरबी समुद्रात बुडालेल्या या जहाजावरील नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. (Wife of engineer of sunken barge appeals to Navy to not stop search, rescue operations)

माझे पती अजून बेपत्ता आहेत, सापडेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवा; अभियंत्याच्या पत्नीचा टाहो
Barge P305
Follow us on

मुंबई: तोक्ते चक्रवीदाळात बार्ज पी 305 हे जहाज बुडून आठवडा होत आला आहे. अजूनही अरबी समुद्रात बुडालेल्या या जहाजावरील नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. आजही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. माझे पती अजूनही बेपत्ता आहेत. ते सापडेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवा, असा टाहो एका अभियंत्याच्या पत्नीने फोडला आहे. अभियंत्याच्या पत्नीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wife of engineer of sunken barge appeals to Navy to not stop search, rescue operations)

तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P305 आणि टगबोट वरप्रदा ही दोन्ही जहाजं अरबी समुद्रात बुडाली आहेत. या दुर्घटनेत 86 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या दुर्घटेनेतील अनेक अधिकारी-कर्मचारी बेपत्ता आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. ही मोहीम सुरू असतानाच नौदलाच्या एका अभियंत्याच्या पत्नीचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती पतीला शोधण्याचं काम सुरूच ठेवा, असं आवाहन करताना दिसत आहे.

काय आहे व्हिडीओत?

‘माझं नाव मेघना जैन आहे. माझे पती सौरभ जैन कंपनीच्या कामानिमित्त बार्ज P305वर गेले होते. जहाज बुडालं आणि तेही बेपत्ता झाले. जोपर्यंत त्यांचा शोध लागत नाही, तोपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरुच ठेवा, अशी माझी विनंती आहे. आसपासच्या बेटावरही जाऊन पाहा. कदाचित ते तिथे असू शकतात. मृतदेह किंवा अन्य गोष्टीची मोजदाद करताना रेस्क्यू ऑपरेशन थांबवू नका’, असं या अभियंत्याची पत्नी बोलताना दिसत आहे.

वादळाच्या इशाऱ्याची माहिती होती

या व्हिडीओत या महिलेने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिचे पती आणि ओएनजीसी कंपनीला वादळाच्या इशाऱ्याची माहिती होती, असा दावा या महिलेने केला आहे. माझे पती मॅकॅनिकल इंजिनीयर आहेत. 12 मे रोजी ते जहाजावर गेले होते. त्या सर्वांना चक्रीवादळाची माहिती होती. कंपनीला तसं पत्रं ही लिहिलं होतं. परंतु, या पत्राचं कुणीही उत्तर दिलं नाही, असा दावा या महिलेने केला आहे.

डीएनए टेस्टची प्रतिक्षा

कंपनी अभियंत्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. अजूनपर्यंत त्यांनी मृतदेहांची ओळख पटवलेली नाही. यातील कुठलाही मृतदेह सौरभ जैन यांचा नसल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे. या कुटुंबाने त्यांचे डीएनए सँपलही दिले आहेत. आता डीएनए टेस्टच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे, असं ओएनजीसीच्या सूत्रांनी सांगितलं. (Wife of engineer of sunken barge appeals to Navy to not stop search, rescue operations)

 

संबंधित बातम्या:

Barge P305 : ONGC कडून मृत्युमुखी आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्यासह बचावलेल्यांनाही आर्थिक मदत

Barge P305 | मी जहाजावरुन परत आलो की बोलू, पण…, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचा हंबरडा

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

(Wife of engineer of sunken barge appeals to Navy to not stop search, rescue operations)