मुंबई : महापालिकेची निवडणूक (Municipal elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकांसदर्भातील कामाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या हद्दी (Ward demarcation) ठरवण्यात येणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रभागाच्या भौगोलिक सीमाांची निश्चिती केली जाणार आहे. भौगोलिक सीमांची निश्चिती केल्यानंतर, त्यावर जर कोणाची सूचना किंवा हरकत असेल तर ती मागवण्यात येईल. त्यानंतर प्राप्त हरकतीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने या पत्रात दिली आहे. तसेच निवडणुकीच्या संदर्भांतील विविध टप्प्यावरील माहिती महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे देखील आयोगाने म्हटले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कामांना सुरुवात झाली आहे. मात्र आरक्षणाच्या सोडतीपूर्वी भौगोलिक सीमांची निश्चिती होणे आवश्यक असते. त्यामुळे आता वार्डाच्या हद्दी ठरवण्यात येणार आहेत. त्यावरील हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. सर्व कामे ही ठरलेल्या वेळेत आणि नियोजनानुसारच पूर्ण होतील. या सर्वांची जबाबदारी ही महापालिका आयुक्तांची असणार आहे.
दरम्यान केवळ वॉर्डाच्या हद्दी ठरवणेच नाही तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर महत्त्वाची कामे देखील ठरलेल्या वेळेतच पूर्ण व्हावीत. निवडणुकांसर्भातील सर्व कामांची माहिती महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी अशा सूचना देखील राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच निवडणुकी संर्भातील कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; 2 फेब्रुवारीला रणनीतीवर काथ्याकूट, भाजपसोबत जाणार का?
राऊतांचं झिंग झिंग झिंगाट फडणवीसांच्या भीतीमुळं! नव्या वाईन धोरणावर गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!