उल्हासनगर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे तक्रार देत त्यांच्यावर हिललाईन पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे आता राज्यातील राजकारण तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून मी बोलत असतानाचा व्हिडीओ मॉर्फ करून तो व्हायरल केला गेला असल्याचा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. गुन्हा मागे नाही घेतला गेला तर महोमार्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरील खोटा गुन्हा मागे घ्या अशी मागणी करत त्यांनी उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांना निवेदन दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी पोलीस प्रशासनावर आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळेच त्यांनी ज्यांनी हा गुन्हा नोंद केला आहे, त्यांच्यावर अगोदर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आही.
यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे की, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा. याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हिललाईन पोलिसांची भेट घेतली आहे.
यावेळी गुन्हा मागे न घेण्यात आल्यास महामोर्चा काढण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसून येते.
जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली असून आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हिल लाईन पोलिसांची भेट घेत हा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आव्हाड यांची बदनामी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उल्हासनगरमध्ये महामोर्चा काढण्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता सिंधी समाजाबद्दल काढलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे म्हटले आहे.