Yakub Memon: ‘तुला माहित नाही टायगरभाई काय चीज आहे’, दाऊदच्या खास माणसाचे नाव घेऊन धमकी, नंतर कबरीचे सुशोभीकरण

| Updated on: Sep 10, 2022 | 6:03 PM

नवरंगे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वताला टायगर मेमन याचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले होते. त्याने धमकीत म्हटले होते की - याकूब भाई यांच्या नशिबात हौतात्म आले आहे, मात्र टायगर भाई अजून जिवंत आहेत. माझे बडा कब्रस्थानमधील काम तुम्ही करुन द्या, अन्यथा टायगर भाईला सांगून तुम्हाला दोघांना ठिकाण्याला लावीन.

Yakub Memon: तुला माहित नाही टायगरभाई काय चीज आहे, दाऊदच्या खास माणसाचे नाव घेऊन धमकी, नंतर कबरीचे सुशोभीकरण
कबर सुशोभीकरणात नवा ट्विस्ट
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई– 1993 बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन (Yakub Memon)याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा वाद पेटताना दिसतो आहे. या प्रकरणात एक नवी माहिती समोर येते आहे. त्यानुसार याकूबचा भाऊ टायगर मेमन (Tiger Memon)याच्या वतीने बडा कब्रस्थानच्या (Bada Kabrastan) ट्रस्टच्या माजी सदस्यांना धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या माणसाने हेही सांगितले होते की त्या कबरीच्या जागेला त्याचे नाव देण्यात यावे. असे केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला होता. या प्रकरणात ज्या व्यक्तीला धमकी मिळाली होती, त्याचेनाव आहे, जझील नवरंगे. नवरंगे यांना ही धमकी 2020साली आली होती. त्यांनी या प्रकरणाची तक्रार तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त, एटीएस चीफ आणि मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे केली होती.

काय देण्यात आली होती धमकी?

नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार, नवरंगे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वताला टायगर मेमन याचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले होते. त्याने धमकीत म्हटले होते की – याकूब भाई यांच्या नशिबात हौतात्म आले आहे, मात्र टायगर भाई अजून जिवंत आहेत. माझे बडा कब्रस्थानमधील काम तुम्ही करुन द्या, अन्यथा टायगर भाईला सांगून तुम्हाला दोघांना ठिकाण्याला लावीन. तुला माहित नाही टायगर भाई काय चीज आहेत. ते आजपर्यंत कुणाच्याही हाताला लागलेले नाहीत. तुम्हाला दोघांना कधी गायब करतील, ते कळणारही नाही. घे आत्ता लगेच टायगरभाईंशी फोनवर बोल.

सारख्या सारख्या अशा धमक्या येत असल्याने नवरंगे यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली होती.

हे सुद्धा वाचा

नवरंगे यांनी काय दिले होते उत्तर?

आपल्या तक्रारीत नवरंगे यांनी नमूद केले आहे की, त्यांना धमकी देण्यात येत असलेल्या ए आर मेमन याला बैकायदेशीर काम करण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतर मेमन यांच्याकडून जामा मशिद ऑफ बॉम्बे ट्रस्टमध्ये बदनाम करण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही तर नवरंगे यांच्याविरोधात ट्रस्टमध्ये खोटी तक्रारही दाखल करण्यात आली होती. काम करण्याच्या बदल्यात ट्रस्टचे लोक पैसे मागत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

याकूब मेमन याच्या कबरीचा वाद

दोषी याकूब मेमन याच्या कबरीचे रुपांतर मजारीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी या कबरीच्या भोवती लाईट्स आणि मार्बल लावण्यात आले. आता हे लाईट्स पोलिसांनी हटवले आहेत. मरिन लाईन्सजवळ असलेल्या बडा कब्रस्थानमध्ये हा प्रकार घडला. याचे समोर आलेले फोटो हे जुने असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र तरीही या लायटिंगला परवानगी दिली कुणी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. यावर कब्रस्थानची देखभाल करणाऱ्याचे म्हणणे आहे की ही जागा मेमन परिवाराने घेतलेली आहे. याकूबनंतर त्याच्या नातेवाईकांना इथेच दफन करण्यात येते.

कब्रस्थान ट्रस्टचे स्पष्टीकरण

या कबरीवर मार्बल लावण्याची परवानगी गेल्या वर्षी ट्रस्टच्या वतीने याकूब मेनन कुटुंबीयांना देण्यात आली होती, असे स्पष्टीकरण कब्रस्थानच्या ट्रस्टने दिले आहे. या कबरीवजवळ एक झाड होते. ते झाड पडल्याने आजूबाजूची माती घसरली होती. त्यामुळे मार्बल लवण्याची परवानगी देण्यात आल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. फोटोतील लाय़टिंग हे 19 मार्च 2022 रोजी बडी रातच्या दिवशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या कबरीत मेमन कुटुबीयांतील एकून 14 जणांना आत्तापर्यंत दफन करण्यात आलेले आहे.