Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्री भारती पवारांना आमदार दिराची धोबीपछाड

| Updated on: Jan 19, 2022 | 1:11 PM

कळवणध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.

Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्री भारती पवारांना आमदार दिराची धोबीपछाड
Bharti Pawar, Nitin Pawar
Follow us on

नाशिकः नगरपंचायत (Nagar Panchayat)निवडणुकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघात बसलेल्या धक्क्यानंतर आता केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना कळवण नगरपंचायत निवडणुकीमध्येही जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी डॉ. पवार यांचे दीर आमदार नितीन पवार यानी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) जोरदार बळ देत चक्क 9 जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला असून, भाजपला (BJP) केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गड गेला…

डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्या मतदारसंघातही तळ ठोकून होत्या. येथे नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणाऱ्या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कळवणमध्येही पुनरावृत्ती

दिंडोरी पाठापोठ कळवणध्येही केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कळवणध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसने तीन जागांवर, तर शिवसेना आणि भाजपला केवळ प्रत्येकी दोन-दोन जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक जागा पटकावली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे दीर आणि आमदार नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून आणण्यासाठी जोर लावत रणनीती आखली होती. ती आजच्या निकालातून फळाला आल्याचे दिसत आहेच.

कळवण नगरपंचायत

– एकूण जागा – 17

– राष्ट्रवादी काँग्रेस – 9

– काँग्रेस – 3

– शिवसेना – 2

– भाजप – 2

– मनसे – 1

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?

Agri | वायदे बाजार बंदी हटवा, जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्या; स्वतंत्र भारत पक्षाचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे