सुनील ढगे, नागपूर : नेहमी बैठकांमध्ये व्यस्त असणारे केंद्रीय मंत्री दुकानात खरेदीसाठी करण्यासाठी बाहेर पडले. ही खरेदी स्वत:साठी नव्हती. एका छोट्या परीसाठी ही खरेदी होती. तिला काय हवे?… तर सायकल. मग कोणाला सांगण्यापेक्षा किंवा आदेश देण्यापेक्षा केंद्रीय मंत्री स्वत: दुकानात गेले. नेहमी कामचुकार अधिकाऱ्यांना फैलावर घेणारे हे मंत्री खरेदीपर्यंत शांत बसून होते. ती छोटी परी ही नाही ती सायकल हवी, असा हट्ट करत होती. अखेर केंद्रीय मंत्र्यांनी तिचा बालहट्ट पूर्ण केला. या प्रकारामुळे दुकानदारासह इतरांनी आश्चर्य वाटले.
कोण आहे ते व्यक्तीमत्व
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. देश विदेशात त्यांचे सतत भ्रमण सुरू असते. दिल्ली – मुंबई- नागपुरात सभा, बैठकांमध्ये ते सतत व्यस्त असतात. सतत कार्यकर्ते, अधिकारी आणि सर्वसामान्य माणसांच्या गराड्यात राहणारा हा लोकनेत्याने कुटुंबासाठी वेळ काढला. हा वेळ त्यांनी आपल्या नातीसाठी काढला. आताच नाही तर नेहमी तिच्यासाठी ते वेळ देत असतात. कधी आईसक्रीम खायला घेऊन जातात, तर कधी खेळणी घेण्यासाठी जातात.
छोटी परी कावेरीचा होता वाढदिवस
नितीन गडकरी यांची छोटी नात कावेरी. तिच्या वाढदिवसासाठी तिला सायकल घेऊन देण्यासाठी आजोबा गडकरी स्वतः दुकानात गेले. कावेरीची खरेदी पूर्ण होईपर्यंत आजोबा दुकानात बसून होते. एरवी शासकीय बैठकीत धडाधड निर्णय घेऊन मोकळे होणारे आणि कुणी निर्णय घेण्यात उशीर लावत असल्यास त्याला आपल्या खास शैलीत फैलावर घेणारे गडकरी साहेब यावेळी मात्र नातवंडांच्या आवडीची सायकल मिळेपर्यंत पूर्णवेळ शांतपणे बसून होते. उलट ‘ और अच्छी साइकल दिखाओ… म्हणत नातवंडांचा उत्साह देखील वाढवीत होते.
अर्थमंत्री गेल्या होत्या भाजी खरेदीसाठी
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण मागील वर्षी भाजी खरेदीसाठी गेल्याचा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला होता. त्यांनी चेन्नईतील मायलापूर भाजी मंडईत जाऊन हातात टोपली घेऊन भाजी घेतील होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमन या स्वतः भाजी घ्यायला आल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्य वाटले होते.