औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दोन गटात हिंसाचार झाला. रात्रीच्या सुमारास हिंसक संघर्ष झाला होता. यावेळी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडले होते. या हिंसाचारादरम्यान इरफान अन्सारी जखमी झाला होता. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. राडा झालेल्या भागात ते जखमी अवस्थेत आढळून आला होता. नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींची संख्या 105 झाली आहे. आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हमीद इंजिनिअरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून दोन प्रकरणांची चौकशी सुरु आहे. या हिंसाचार प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या फहीम खानने जामिनासाठी अर्ज केला आहे. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल. डीसीपी हल्ला आणि महिला विनयभंगाचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. नागपूरमधील हिंसाचार 20 दुचाकी, 40 चारचाकीचे नुकसान झाले तर 2 क्रेन जाळण्यात आल्या. उड्डाणपुलाच्या कामासाठी असणाऱ्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा आहे. वाहनाचे पूर्ण नुकसान झाल्यास प्रति वाहन 50 हजार रुपये मिळणार आहे. अंशतः नुकसान झाल्यास प्रति वाहन 10 हजार मिळणार आहे. विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही.
172 व्हिडिओ सापडले
नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले आहेत. बांग्लादेश आणि इतर देशातील IP अड्रेसवरुन हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. 172 व्हिडिओंचा IP अड्रेस आणि मोबाइल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच मालेगाव कनेक्शन समोर आलं आहे. फहीम खान पाच महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेल्याच समोर आलय. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.