नागपूर : पतंग उडविताना दोन मजली इमारतीवरुन खाली पडून एका 12 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू (Childred Death) झाल्याची घटना घडली. मोहित तरुण शाहू असं बालकाचं नाव असून रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संक्रांतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पंतग उडवले जातात. या काळात लहान मुलांनी स्वत:ची काळजी घेऊन पंतग उडवावे असा सल्ला दिला जातो. मात्र दरवर्षी अशा अनेक घटना घडतात. यात आता नागपुरात (Nagpur) दोन मजली इमारतीवरुन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. मोहित तरुण शाहू असं मृत मुलाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील पारडी परिसरातील भोले नगरात 12 वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे आई-वडील बांधकाम मजूर असल्यामुळे ते कामावर गेले होते. याच काळात घरी कोणीही नसल्यामुळे त्यांचा 12 वर्षीय मुलगा पंतग घेऊन दोन मजली इमारतीवर गेला. इमारतीवर जाऊन तो पतंग खेळत होता. याच दरम्यान पतंग खेळताना तो दुमजली इमारतीवरुन थेट खाली पडला. या दुर्घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला.
मोहित तरुण शाहू असं मृत मुलाचे नाव आहे. हा मुलगा इमारतीवरुन खाली पडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लोकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे मृत मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलगा बाहेर गेल्यानंतर तो काय खेळ खेळतोय. त्याच्यासोबत कोण आहे ? याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या :
Raigad Crime | धमकी देत रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 जण अटकेत, तिघे फरार