नागपूरात लग्नाच्या वाढदिवशी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून या दाम्पत्याने आत्महत्या केली. या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी लग्नाचे कपडे परिधान केले. आर्थिक परिस्थितीमुळे दोघांनी आत्महत्या केली. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप आणि पत्नी ॲनी जारील मॉनक्रिप अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
दोघांचा प्रेमविवाह, पण यामुळे निराशा
टोनी आणि ॲनी जारील मॉनक्रिप असे या दाम्पत्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचा पण संसार सुखी होता. पण त्यांना मुलेबाळं नव्हते. दोघांना आयुष्यात नैराश्य आले होते. दोघेही त्यामुळे मनाने खचले होते. कोरोनानंतर टोनीची नोकरी गेली. तेव्हापासून टोनी नैराश्यात गेला. गेल्या दोन वर्षांपासून टोनी कामाच्या शोधात होता. त्यातच मुलबाळं होत नसल्याने दोघे निराशेत गेले. दोघांचा एकमेकांना आधार होता.
घटनेने सर्वांना धक्का
पती-पत्नी उदास राहत होते. मुलं नसल्याने त्याच विचारात ते असत. नातेवाईक त्यांची समजूत काढत होते. सर्वच बाजूनी निराश झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत गेले. त्यांना जीवनात काहीच रस नसल्याचे वाटत होते. नातेवाईकांनी त्यांची अनेकदा समजूत घातली. दोन महिन्यांपासून दोघे आत्महत्येचा विचार करत होते.
ख्रिसमसनंतर दोघेही निराश होते. दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या केली. लग्न वाढदिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी जेवणही केले नाही. सकाळपासून दोघांनी काहीही खाले नाही. अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले. चिठ्ठीत आत्महत्या करण्याचे नमूद करत दोघांनी नातेवाईकांची माफी मागितली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात ही दुर्दैवी घटना घडली.
नातेवाईकांना फोन करून केली विचारपूस
टोनी आणि ॲनीने सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला. त्यांची विचारपूस केली. सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले. पती-पत्नीने घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. सकाळचे 10 वाजले तरी दोघेही बाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघेही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले.