Nagpur | खासदार महोत्सवात आजपासून सांस्कृतिक मेजवाणी, अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते उद्घाटन

| Updated on: Dec 17, 2021 | 6:20 AM

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद्घाटन झाल्‍यानंतर लगेच चक दे इंडिया या थीमवर फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट होणार आहे. सुखविंदर सिंह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा करणार आहेत.

Nagpur | खासदार महोत्सवात आजपासून सांस्कृतिक मेजवाणी, अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते उद्घाटन
khasdar mahotsav
Follow us on

नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव -2021 (MP cultural Festival) चा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. हा मध्‍य भारतातील सर्वात मोठा सांस्‍कृतिक उत्‍सव मानला जात आहे. बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त (actor Sanjay Dutt) यांच्‍या हस्‍ते खासदार महोत्‍सवाचे उद्घाटन होणाराय. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व आयोजन समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्‍यवर उपस्थित राहतील.

चक दे इंडिया थीमवर लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. भारतीय कला व संस्‍कृतीचा प्रचार-प्रसार व्‍हावा, विदर्भातील प्रतिभावंतांना मोठा मंच मिळावा, राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या कलाकारांची कला नागपूरकरांना अनुभवता यावी, या हा त्‍यामागील उद्देश होता. कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्‍या खंडानंतर परत एकदा खासदार महोत्‍सवाचं भव्‍य आयोजन करण्‍यात आलंय. यंदा देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करीत आहे. त्‍याच संकल्‍पनेवर महोत्‍सवाची आखणी करण्‍यात आलेली आहे. मान्‍यवरांच्‍या उपस्‍थ‍ितीत खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद्घाटन झाल्‍यानंतर लगेच चक दे इंडिया या थीमवर फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट होणार आहे. सुखविंदर सिंह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा करणार आहेत.

घरबसल्‍या मिळवा पासेस

नागपूरकरांनी या दहा दिवसीय खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आनंद घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. अनिल सोले व पदाधिका-यांनी केले आहे. नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत. त्‍याकरिता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्‍लीक केल्‍यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करता येईल.

कोविड नियमांचे होणार पालन होणार

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर सरकारने त्‍यासंदर्भात घालून दिलेल्‍या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची त्‍यासाठी मदत घेतली जात आहे. आयोजनस्‍थळी दररोज 8 ते 10 हजार N- 95 मास्‍क वितरित केले जाणार आहेत. दोन खुर्च्‍यांमध्‍ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून पटांगणाच्‍या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था राहणार आहे.

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे वेळापत्रक

शुक्रवार, 17 डिसेंबर : उद्घाटन व सुखविंदर सिंग यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट – चक दे इंडिया
शन‍िवार, 18 डिसेंबर : कैलाश खेर अँड कैलासा बँड लाईव्‍ह परफॉर्मन्‍स
रव‍िवार, 19 डिसेंबर : कविसंमेलन सहभाग – कुमार विश्‍वास, विमल त्‍यागी, शिखा पचौरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी
सोमवार, 20 डिसेंबर : काणेबुवा प्रतिष्‍ठानचा व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल कार्यक्रम
मंगळवार, 21 डिसेंबर : नॉर्थ – साऊथ जुगलबंदी
बुधवार, 22 डिसेंबर : निराली प्रॉडक्‍शनचे आम्रपाली महानाट्य
गुरुवार, 23 डिसेंबर : सांस्‍कृतिका उत्‍सव डॉ. सय्यद पाशा आणि चमूचा डान्‍स ऑन व्हिल्‍स
शुक्रवार, 24 डिसेंबर : महाराष्‍ट्राची हास्‍य जत्रा
शन‍िवार, 25 डिसेंबर : शंकर महादेवन यांचा माय इंडिया… माय म्‍युझिक कार्यक्रम
रव‍िवार, 26 डिसेंबर : राधारासबिहारी हेमामालिनी यांची नृत्‍यनाटिका

NMC | नागपूर मनपात आणखी एक नवा घोटाळा उघडकीस, जन्म-मृत्यू विभागातील काय आहे प्रकरण? वाचा

Nagpur | तीन लाखांचा नायलॉन मांजा जप्त, विक्रीवर बंदी तरीही बाजारात कसा?