नागपूर: शहरातील नवी मंगळवारी तलाव शुद्धीकरणासाठी आम आदमी पार्टी झोन कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नवी मंगळवारी हा तलाव वस्तीच्या मध्यभागी असून तो अतिशय खराब झाला आहे त्या पाण्यातून घाण वास येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तलावाची स्वच्छता करण्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे.
तलावात नागरिकांच्या घरातील गडर लाईन च पाणी सोडले जात असल्याने तो अस्वच्छ झाला . हा तलाव साफ करण्यासाठी वारंवार मनपा ला सूचना आणि तक्रारी करून सुद्धा अधिकारी आणि प्रशासन या कडे लक्ष देत नसल्याने आज हा मोर्चा काढण्यात आला. आम आदमी पार्टी आता या साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार त्याची सुरवात आज चा मोर्चा असून यानंतरही जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर या पेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा नरेंद्र पोहनिकर नागपूरचे आम आदमी पार्टी संघटन मंत्री यांनी दिली आहे.
मंगळवारी तलावा च्या सफाई कामाची सुरुवात न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा – आप
आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी मंगळवारी तलाव याच्या साफसफाई व सौंदर्य करण करण्यासाठी आम आदमी पार्टीने साई मंदिर नवी मंगळवारी तलाव ते सतरंजीपुरा झोन वर धडक मोर्चा. @Aapkajagjeet @AAPdcwankhade pic.twitter.com/KMHLJx3Evy— AAP Nagpur (@AAP4Nagpur) August 3, 2021
कोरोनाचा संसर्ग फक्त हॅाटेल व्यावसायीकांमुळेच वाढतो का? राज्य सरकारला हा सवाल करत, पुन्हा आंदोलनाचा इशारा नागपुरातील संतप्त हॅाटेलचालकांनील दिलाय. राज्य सरकारनं लॅाकडाऊनचे निर्बंध शिथील करत व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. पण हॅाटेल व्यावसायिकांना यातून डावलण्यात आलं. त्यामुळे नागपूरातील हॅाटेलचालक संतप्त झाले आहेत…
नागपुरात निर्बंध शिथील झालेत, पण हॅाटेल व्यावसायिकांना त्यातून वगळण्यात आलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे नागपूरातील हॅाटेल व्यावसायिक नाराज आहेत. राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारून हॅाटेल चारनंतरंही सुरु ठेवण्याचा इशारा हॅाटेल व्यावसायिकांनी दिलाय.हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजेंदर सिंग रेणू यांनी सरकार व्यापाऱ्यांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले तरिही, हॅाटेल व्यावसायिकांसाठी व्यापारी संघर्ष समिती रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या:
सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! पुढील 3-5 वर्षांत त्याचा भाव दुप्पट होणार