नागपूरः अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून डिसेंबर महिन्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (Maharashtra State Cooperative Bank) साखर कारखान्यांच्या (Sugar Factory) घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल नऊ तास त्यांची चौकशी (Inquiry) झाली होती. त्यानंतर आज ईडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. यावेळी तनपुरेंची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीच्याच राज्यमंत्र्याच्या कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आता पुन्हा खळबळ उडाली आहे.
नागपूरमध्ये प्राजक्त तनपुरे यांचा राम गणेश गडकरी साखर कारखाना आहे. त्याचा लिलाव झाल्यापासून हा कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर हा कारखाना प्रसाद शुगर अँड अलाईड कंपनीने विकत घेतल्यानंतर ईडीलाही या कारखान्याचा व्यवहार संशयास्पद वाटत होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीही मुंबई, पुणे, नागपूर आणि अहमदनगरमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या.
ED attaches assets worth Rs. 13.41 crores in illegal auction of Ram Ganesh Gadkari SSK by MSCB causing loss to the bank. Attach assets include 90 acre land of the said SSK and 4.6 acres nonagricultural land in Ahmednagar.
— ANI (@ANI) February 28, 2022
कारखान्याची 90 एकर जमीन जप्त
त्यानंतर आज नागपूरात ईडीकडून धाडी टाकल्यानंतर राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. या ईडीच्या धाडीत तनपुरेंची एकूण 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या धाडीत नागपूरमधील कारखान्याची एकूण 90 एकर जमीन तर अहमदनगरमधील 4 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ईडीकडून त्यांची चौकशी केली होती तेव्हा, त्यांनी स्पष्ट केले होते की, ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचे मी समाधानकारक उत्तर दिले आहे, मात्र आता त्यांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्राजक्त तनपुरे कोण आहेत
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी पक्षातून राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच सुरू झाला. नगरपरिषदेच्या राजकारणापासून त्यांच्या राजकारणा सुरुवात झाली. ते जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते.उत्कृष्ट संघटक म्हणूनही ते राहुरीत प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीने विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राज्यातील तरुण मंत्री आणि आमदार आहेत. राजकीय घराण्यातून आलेल्या तनपुरे यांना पहिल्यांदाच आमदार होताच मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. ते उच्च शिक्षित असून बी. ई., एमबीए, एमएस या पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतून शिक्षण घेतलं आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. ते प्रसाद साखर कारखान्याचे चेअरमनही आहेत.
संबंधित बातम्या
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी इतिहास वाचून वक्तव्य करायला हवं होतं : उदयनराजे भोसले