नागपूर : तीन दिवस व्यापाऱ्यांची जाण्यायेण्याच्या मार्गापासून तर त्याच्या दुकानात रेकी केली. चौथ्या दिवशी दुकानदाराची लूट केली. नागपूरच्या पाचपावली पोलीस (Pachpavli Police) स्टेशन हद्दीत रात्रीच्या अंधाराचा आरोपीने फायदा घेतला. यात प्रकरणात तीन आरोपी असल्याची माहिती आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन फरार आहेत. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत गणेश ट्रेडर्स नावच मोठं किराणा दुकान ( Grocery Shopkeeper) आहे. तीन आरोपी काही तर खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात जायचे. दुकानदाराची दिनचर्या काय आहे, याची माहिती त्यांनी काढली. दुकानदाराचा गल्ला किती, तो कोणत्या मार्गाने रात्री घरी जातो. याची सर्व माहिती तीन आरोपींनी घेतली. तीन दिवस रेकी (Reiki ) केली. चौथ्या दिवशी प्लान आखला.
दुकानदाराने दिवसभराचा विक्रीचा पैसा एकत्र केला. दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन तो घरी जायला निघाला. मात्र त्याच्या मागावर असलेल्या आरोपीने त्याला पाचपावली पुलाच्या खाली थांबवले. चाकूचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेऊन पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू करत एका आरोपीला अटक केली. मात्र दोन अजूनही फरार आहेत. तिन्ही आरोपी कुख्यात आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पाचपावलीचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
या घटनेमुळे मात्र परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. पाचपावली परिसरातील व्यापारी सुद्धा धास्तावले आहेत. नागपूर शहरात खुनाच्या घटना कमी झाल्या असल्या तरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा या चोरट्यांवर वचक बसविण्यासाठी पोलीस काय उपाययोजना करतात, हे पाहावं लागेल.