Vidarbha ShivSena : विदर्भातील तिन्ही खासदार शिंदे गटात, ठाकरेंच्या शिवसेनेचा जोर थंडावणार, यवतमाळात शिवसैनिक जोरात

| Updated on: Jul 19, 2022 | 6:12 PM

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी ईडीच्या धाकानं शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात तशाही त्या तीन वर्षात सक्रिय नव्हत्या. त्यामुळं कार्यकर्ते नाराज होते.

Vidarbha ShivSena : विदर्भातील तिन्ही खासदार शिंदे गटात, ठाकरेंच्या शिवसेनेचा जोर थंडावणार, यवतमाळात शिवसैनिक जोरात
कृपाल तुमाने, प्रताप जाधव, भावना गवळी,
Follow us on

नागपूर : शिवसेनेचा गटनेता बदलण्याची मागणी 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं केली. 12 खासदारांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. हे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेत. गटासंदर्भातसुद्धा लोकसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. या 12 खासदारांमध्ये विदर्भातील शिवसेनेचे तीन खासदार आहेत. त्यामध्ये नागपूरचे कृपाल तुमाने, बुलडाण्याचे प्रताप जाधव व यवतमाळ-वाशिमच्या (Yavatmal) भावना गवळी आहेत. विदर्भातील तिन्ही खासदार शिंदे गटात गेल्यामुळं शिवसेनेचा जोर थंडावणार आहे. बुलडाण्यात प्रताप जाधव म्हणतील ते शिवसेना आहे. त्यामुळं बुलडाण्यात (Buldana) दोन आमदार एक खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटातील शिवसेना फारच कमी राहणार आहे. यवतमाळात आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी शिंदे गटात गेल्यानं त्यांच्यासोबत त्याचे खास कार्यकर्तेही जातील. पण, मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरेंची सेना तग धरून राहतील. शिवाय नागपुरातही (Nagpur) कृपाल तुमाने यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते शिंदे गटात गेलेत. या सर्व कारणांनी शिवसेनेचा जोर थंडावणार आहे.

बुलडाण्यात ठाकरे गट थंडावणार

बुलडाणा जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार शिंदे गटात गेलेत. उद्धव ठाकरे यांना भेटता येत नव्हते. काम होत नाही. हीच नाराजी आहे, असं सांगितलं जातंय. खासदाराशिवाय शिवसेना नाही. खासदार प्रताप जाधव व आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड हे दोन्ही शिंदे गटात गेले. शिवाय माजी आमदारही गेलेत. आमदार आणि खासदार गेल्यामुळं ठाकरेंच्या गट नाहीच्या बरोबर राहणार आहे. माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर हे जुने शिवसैनिक आहेत, यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

यवतमाळात शिवसेनेचे कार्यकर्ते जोरात

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी ईडीच्या धाकानं शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात तशाही त्या तीन वर्षात सक्रिय नव्हत्या. त्यामुळं कार्यकर्ते नाराज होते. आता शिंदे गटात गेल्या. त्यामुळं फारसा फरक पडेल, असं वाटत नाही. संजय राठोड हेही शिंदे गटात गेलेत. तरीही जुने शिवसैनिक उद्धव ठाकरेंची सेना उभी करण्याचा संकल्प करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मूळ शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही

नागपूर जिल्ह्यात शिवसेना फारशी सक्रिय नाही. त्याचे जुने-नवीन असा वाद सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने शिवसेनेचे खासदार असले तरी काम मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांचीच करायचे असा आरोप आता जुन्या शिवसैनिकांकडून केला जातो. युती होती म्हणून भाजपच्या जोरावर कृपाल तुमाने निवडून आले होते. रामटेकमध्ये कोणताही खासदार फक्त शिवसेनेच्या जोरावर निवडून येऊ शकत नाही. कृपाल तुमाने यांनी शिवसेना वाढविण्यासाठी तसाही प्रयत्न केला नव्हता. त्यांच्यासोबतीला मोजकेच कार्यकर्ते होते. भाजपवाल्यांना ते काम देत होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फारसा काही फायदा नव्हता.