काँग्रेसचा भाजपच्या कार्यालयावर आंदोलनाचा इशारा; भाजप कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्याच काढल्या

| Updated on: Feb 09, 2022 | 1:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने मुंबईत मजुरांना पैसे देऊन गावाला पाठवले. तसेच या लोकांना कोरोना फैलावण्यासाठी काँग्रेसनेच उसकवलं होतं, असा आरोप थेट संसदेत केला होता. मोदींच्या या विधानावर संपूर्ण महाराष्ट्रातून पडसाद उमटत आहेत. काँग्रेसने मोदींच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आज राज्यभर आंदोलन सुरू केली आहेत.

काँग्रेसचा भाजपच्या कार्यालयावर आंदोलनाचा इशारा; भाजप कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्याच काढल्या
काँग्रेसचा भाजपच्या कार्यालयावर आंदोलनाचा इशारा; भाजप कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्याच काढल्या
Follow us on

स्वप्नील उमप, अमरावती: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काँग्रेसने (congress)  मुंबईत मजुरांना पैसे देऊन गावाला पाठवले. तसेच या लोकांना कोरोना फैलावण्यासाठी काँग्रेसनेच उसकवलं होतं, असा आरोप थेट संसदेत केला होता. मोदींच्या या विधानावर संपूर्ण महाराष्ट्रातून पडसाद उमटत आहेत. काँग्रेसने मोदींच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आज राज्यभर आंदोलन सुरू केली आहेत. भाजपच्या कार्यालयासमोर काँग्रेसची आंदोलने सुरू आहेत. अमरावतीतही भाजपच्या (bjp) कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. भाजप कार्यकर्त्यांनी या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसचं हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. काँग्रेसचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या बाहेर काढून ठेवल्या आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयावर चाल करून आल्यास त्यांना ठोकून काढू, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन देखील केली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपनेही बाह्यावर केल्या आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जर भाजपच्या कार्यालयावर मोर्चा आणला तर भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ठोकून काढतील, असा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिला आहे. अनिल बोंडे यांनी एका ऑडिओ क्लिपद्वारे हा इशारा दिला होता. त्यानंतर भाजप कार्यालयाभोवती भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली. यावेळी कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या दाखवत शक्ती प्रदर्शन केले. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन भाजप कार्यकर्त्यांना तात्काळ त्यांच्याजवळील लाठ्याकाठ्या काढण्यास सांगितले. तसेच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काळं कुत्रं जरी आलं तरी झोडून काढू

नाना पटोले तुम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये उष्टं खरकटं मिळतं. त्यात तुम्ही समाधानी माना. पटोलेंनी आता मोठ्यामोठ्या बाता मारू नये. आज अमरावती येथे राजकमल चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे 25 पण कार्यकर्ते नव्हते, असा टोला बोंडे यांनी लगावला. खरं तर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच बळ आणि इच्छाही संपली, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर आले तर त्याला झोडल्या शिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत, अशी धमकी त्यांनी दिली.

संबंधित बातम्या:

तेव्हा मी काहीच बोललो नाही… नंतर ते माझ्यासाठी आले… पास्टर निमोलरच्या कवितेतून राऊतांचा सावधानतेचा इशारा

नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वेवर दिल्लीत मंथन; पवार, दानवे, कोल्हे यांची काय झाली बैठक?

परळीत पंकजा मुंडेंच्या ऑफिसबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शने, पंतप्रधानांनी 12 कोटी जनतेची माफी मागण्याची काँग्रेसची मागणी