Nagpur education फिरत्या बसमधून संगणक शिक्षण, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार गोडी

| Updated on: Dec 02, 2021 | 6:50 PM

अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना म्हणाले, नागपूर मनपा शाळेत शिकणारे विद्यार्थी हे मुख्यत: गरीब आणि गरजू आहेत. त्यांना संगणक शिक्षण घेणे अनेक कारणांमुळे अवघड जाते. आधुनिक शिक्षणामध्ये निर्माण होणारी ही उणीव पूर्ण करण्यात येईल.

Nagpur education फिरत्या बसमधून संगणक शिक्षण, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना लागणार गोडी
फिरत्या संगणक बसमध्ये अभ्यास करताना मनपा शाळेचे विद्यार्थी.
Follow us on

नागपूर : मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिरत्या संगणक बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पाचवी ते नववीच्या आठ हजार विद्यार्थ्यांना या संगणक बसचा फायदा होणार आहे. सर्व सोयीसुविधांनी ही बस सज्ज राहणार आहे. या बसचे आज मकरधोकडा येथील मनपाच्या शाळेत उद्घाटन करण्यात आले.

8 हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा

एलकेम कंपनीद्वारे सीएसआर निधीमधून आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्यानं नागपूर मनपाला एक बस देण्यात आली आहे. एलकेम कंपनीद्वारे सह्याद्री फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अत्याधुनिक बसमध्ये 18 सिट्स असून यामध्ये लॅपटॉप प्रोजेक्टर, एसी, प्रथमोपचार पेटीची व्यवस्था आहे. यावर इयत्ता पाचवी ते नववीच्या अंदाजे 8,000 विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण तसेच अभ्यासक्रमाचे शिक्षण प्राप्त होणार आहे. संगणक शिक्षणामुळे मनपाच्या विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक कल्पना, आविष्कार यासंदर्भात त्यांच्या पंखांना बळ मिळेल.

स्पर्धेमध्ये टिकण्यास होणार मदत

यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना म्हणाले, नागपूर मनपा शाळेत शिकणारे विद्यार्थी हे मुख्यत: गरीब आणि गरजू आहेत. त्यांना संगणक शिक्षण घेणे अनेक कारणांमुळे अवघड जाते. आधुनिक शिक्षणामध्ये निर्माण होणारी ही उणीव पूर्ण करण्यात येईल. या व्यवस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाद्वारे नव्या विश्वाकडे जाण्यास मदत होईल. स्पर्धेमध्ये ते आपले अस्तित्व सिद्ध करून यशाचे शिखर गाठू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करता आले. या संगणक शिक्षण बसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात मदत होईल. त्यांना त्यात आवड निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही जोडणार

एलकेम संस्थेचे प्रबंध निदेशक अय्यर श्रीनिवासन यांनी आपल्या भाषणात एलकेमच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. या प्रकल्पाचा उद्देश शाळकरी मुलांना संगणक शिक्षणाकडे वळविणे हा आहे. ही बस विविध शाळांमध्ये फिरणार आहे. त्यांना संगणक शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कंपनीचे दुष्यंत पाठक म्हणाले. याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेवगावकर, एलकेमच्या नागपूर प्लांट हेड दुष्यंत पाठक, सह्याद्रीचे अध्यक्ष विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Dinosaur Fossil चंद्रपुरात आढळले डायनासोरचे जीवाश्म, प्रा. सुरेश चोपणे यांचे संशोधन

Vidarbha Movement! विदर्भ राज्य आंदोलन पार्टी आक्रमक, केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला