नागपूर : राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut ) यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ (Ambedkar on Population Policy Contemporary Relevance) या पुस्तकाचे वसंतराव देशपांडे सभागृहात प्रकाशन (Pustak Prakashan) पार पडले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबई वरून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात होते. प्रमुख पाहुणे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लीकार्जुन खरगे, अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो. डॉ. केविन डी. ब्राऊन, अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक के. राजू व तामिळनाडूचे आमदार सिलिव्हम उपस्थित होते. राज्यसभेतील पक्षनेते मल्लीकार्जुन खरगे यांनी नागपूरकर जनतेपुढे या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या दीर्घ राजकीय वाटचालीचा आढावा दिला. नागपूर भूमी प्रेरणास्थान असल्याचे स्पष्ट केले. नागपूरकरांच्या परिवर्तनाचा संपूर्ण देशाला फायदा झाला आहे. बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्राणची भूमिका 1938 मध्ये मांडली. त्या भूमिकेची अंमलबजावणी 1974 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली. हे दोन्हीही नेते किती द्रष्टे होते. हे लोकसंख्या निर्णयावरील त्यांच्या भूमिकेने स्पष्ट होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मानव जातीच्या समस्येच्या कोणत्याही प्रश्नावर उपाय योजना सुचविण्याची क्षमता आंबेडकरी साहित्यात असल्याचे सांगितले. तत्पुर्वी पुस्तकाचे लेखक डॉ. नितीन राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. लोकसंख्येच्या समस्ये संदर्भात बाबासाहेबांनी केलेले सुतोवाच लक्षात घेतले गेले नाही. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसंख्या नियंत्रणावर 70 च्या दशकात धाडसी निर्णय घ्यावे लागले. बाबासाहेबांनी सुचवलेल्या मार्गांनी निर्णय घेतल्यामुळे 1950 च्या काळात 1 लाख मुलांच्या जन्मामागे 1 हजार महिलांचा प्रसूती दरम्यान वा पश्चात मृत्यू होत होता. मात्र आता दोन अपत्यांचा निर्णय घेतल्यामुळे ताजा आकडेवारीनुसार ही संख्या एक लाखाला 103 पर्यंत कमी झाली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रदीप आगलावे यांनी यावेळी या पुस्तकावर समीक्षण सादर केले. डॉ. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ हे पुस्तक त्यांच्या पीएचडीच्या संशोधनावर आधारीत आहे. लोकसंख्येचा विस्फोट संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंडीपेडंट लेबर पार्टीच्या जाहीरनाम्यात चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात बाबासाहेबांनी 10 नोव्हेबर 1938 रोजी मुंबई विधानसभेत बिल सादर केले होते. त्याला प्रचंड विरोध झाला. परंतु, नंतर बाबासाहेबांच्या धोरणांचाच भारताने पुरस्कार केला. गर्भनिरोधक हा महत्वाचा उपाय त्यांनी सुचविला होता. भारताची लोकसंख्या 1921 पासूनच्या जनगणनेचा आधार घेतल्यास कधीच कमी झाली नाही. सतत वाढत गेली आहे. या सगळया वस्तुस्थितीची मागणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कुटुंब नियंत्रणाच्या संदर्भातील दृष्टीकोन आजच्या काळात देखील महत्वपूर्ण आणि प्रासंगिक आहे. असे या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Chandrapur : दहशत माजवणाऱ्यांच्या तळपायावर फटके देत सगळी मस्ती उतरवली! पोलिसांची दबंग कारवाई