नागपूर : संपूर्ण देशामध्ये विजेचं संकट निर्माण झालेलं आहे. कोरोना संपला आणि सगळे कामाला लागले. त्यामुळे विजेची मागणी वाढली, असं स्पष्टीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिलं. गेल्या महिन्यात तापमान वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे. सोबतच आता सणासुदीचा काळ असल्यामुळे देखील विजेची मागणी वाढलेली आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये फरक आहे. त्यामुळं बाहेरून वीज घ्यावी लागते. अनेक ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे. त्याठिकाणी रेल्वेच्या रॅक (racks of railways) मिळत नाही आणि ज्या ठिकाणी रॅक आहेत तिथे कोळसा उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे. राऊत म्हणाले, विरोधक म्हणतात की, आम्ही कोळशाचा साठा केला नाही. पण आम्हाला रेल्वेनं रॅक उपलब्ध करून दिल्या नाही तर साठा कसा कसा करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत विरोधकांना उत्तर (reply to the opposition) दिलं.
नितीन राऊत म्हणाले, आमच्याकडे प्लांट्स उपलब्ध असताना आम्ही शंभर टक्के आणि प्लांट चालवू शकत नाही. कारण आम्हाला केंद्राने साठा दिला असता तर आम्ही बाहेरून इंपोर्टेड साथ मागवला नसता. असं म्हणत वीज निर्मितीचा संकट केंद्रामुळे निर्माण झालं आहे. असं म्हणत त्यांनी वीज निर्मितीचा संकट केंद्र सरकारमुळं निर्माण झालं असा त्यांनी आरोप केला आहे. ज्या भागामध्ये जास्त लॉस झाले आहे आणि ज्या भागांमध्ये वीजचोरी होत आहे. लोक बिल भरत नाही आहेत त्या भागांमध्ये जास्त लोड शेडिंग करण्यात येत आहे.
लोडशेडिंगपासून जर वाचायचं असेल तर ऊर्जा मंत्री यांनी लोकांना विजेचा बिले भरण्याचा सल्ला देखील या निमित्ताने दिलेला आहे. ग्रामविकास विभागाचा निधी अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही. 9 हजार कोटींचा निधी राज्य शासनाकडे आहे. पण काही अधिकारी म्हणतात, ग्रामविकास विभागाचा आणि नगर विकास विभागाचा जो निधी आहे त्यावरील व्याज माफ करा. त्याचं माफ केला तर सर्वसामान्य म्हणतील आम्ही काय बिघडवलं. तेही म्हणतील की आमचाही माफ करा म्हणून ते माफ करू शकत नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.