‘शरद पवार आमचा विठ्ठल’, अमोल मिटकरींच्या ‘त्या’ विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

| Updated on: Dec 27, 2022 | 7:19 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

शरद पवार आमचा विठ्ठल, अमोल मिटकरींच्या त्या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
Follow us on

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन निशाणा साधला. “अमोल मिटकरी बोलले की, शरद पवार आमचा विठ्ठल आहे. ते चांगल्या हेतूने बोलले असतील. शरद पवार मोठेच नेते आहेत. पण देवाशी तुलना होऊ शकते का?” असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला.

“छत्रपती उदयनराजे यांना ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत का याचे पुरावे मागणारे लोकसुद्धा आपल्याकडे आहेत. हा छत्रपती घराण्याचा अपमान नाहीय का? आपण आज ज्यावेळी असं बोलतो की, हो आमच्यावर अफजल खानाच्या फौजा पाठवा. म्हणजे तुम्ही स्वत:ला छत्रपती समजता? तुम्ही स्वत:ला छत्रपती समजून अशाप्रकारे बोलता?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.

“ठाकरे गटाच्या नेत्या म्हणाल्या, संजय राऊतांच्या मातोश्री मा जिजाऊ सारख्या आहेत. त्यांनी शिवबांसारखा हिरा जन्माला घातला. आपण कुणाशी तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात. कुठल्याच मातेचा अपमान नाही. पण ही तुलना होऊ शकते काय?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

“रेड्याला शिकवण्याचं सामर्थ्य आहे म्हणून संतांचा चमत्कार म्हणतात तर सामान्य माणसांना का शिकवलं नाही? असं म्हणत नामदेव महाराजांचा अपमान करत कुत्र्याचा दूध देतात पण माणसाला देत नाही, अशा प्रकारचे जे वक्तव्य समोर आले आहेत त्यांचा निषेध आपण केला का? नाही केला”, असं फडणवीस म्हणाले.

“ज्या वारकरी संप्रदायाने जात विरहीत एक वारकरी समाज निर्माण केला ज्यामध्ये संत चोखोबा आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली देखील आहेत. दोन्ही संतांची जात कुणी विचारत नाही. जगदगुरु तुकराम महाराजांचा विचार समाजापर्यंत पोहोचवणारे वेगवेगळ्या समाजाचे लोकं आहेत. संताजी महाराज ज्यांनी तुकोबांच्या गाथा वाचवल्या ते काही तुकोबांच्या समाजाचे नाहीत. ज्यांनी गाथा वाचवली ते तुकोबांच्या समाजाचे नव्हते. पण आज त्यांनाही समाजात विभाजित केलं जातं आणि त्याबद्दल कुणीही बोलत नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.