नागपूर : उमरेड करांडला जंगलातला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओत एक वाघीण आणि तिचे तीन छावे दिसत आहेत. कुणातरी पर्यटकानं हे व्हिडिओ फेसबूकवर व्हायरल केलेत.
पवनीजवळील उमरेड करांडला जंगलात टी फाईव्ह शाडो मादा वाघीण सह 3 पिल्ल्यांचा डेरा असल्याचं दिसून आलं. या अभयारण्यात पर्यटकांना ही वाघीण आपल्या पिल्लांसह दिसली. त्यामुळं पर्यटक जाम खूश आहेत.
लॉकडाउन शिथिल झाल्यावर राज्यातील संपूर्ण अभयारण्य सुरु करण्यात आले. पर्यटकांची मांदियाळी भंडारा जिल्ह्यात पहायला मिळत आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्यात विशेषता पवनीजवळील उमरेड करांडला जंगलाकडं पर्यटकांची गर्दी वळली आहे. तर पवनी येथील उमरेड करांडला जंगलात टी फाईव्ह शाडो नामक वाघीण व तिचे 3 पिल्ले यांच्या डेरा पहायला मिळत आहे. पर्यटकांना याचे सतत दर्शन घडत आहे. आज पवनी उमरेड करांडला अभ्ययारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपलीत.
उमरेड येथे काही दिवसांपूर्वी वाघाचे अवयव विक्री करणाऱ्यांना अटक करण्यात आली. वनविभागानं अभयारण्यात गस्त वाढविली. अशात वाघोबाचं दर्शन झाल्यानं शहरातील पर्यटक पुन्हा उमरेड करांडला अभयारण्याकडं वळतील.