नागपूर : सांझज्योत सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून गोरगरीब, गरजूंना, वृद्धांना, तसेच अनाथांना ब्लांकेट्स, सॉक्स वाटप केले जाते. कुडकुडत्या थंडीत त्यांनाही ऊब मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. सांझज्योत परिवार हे नागपुरातील एक सेवाभावी संस्था आहे. जे संथ आणि शांत गतीने आपले सेवाभावी कार्य मागील दहा वर्षापासून नागपूर शहरात करीत आहे.
मागील दहा वर्षांपासून छोटेमोठे उपक्रम राबविले जात होते. पण खऱ्या अर्थाने 2017 पासून सांझज्योत ह्या नावाखाली काही कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी बऱ्याच सेवाभावी कार्याला नावारूपाला आणलंय.
या संस्थेला ते एका परिवाराप्रमाणे मानतात. त्यातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा आहे. त्यातून कोरोनासारख्या महामारीत सांझज्योतकडून 1 हजार कुटुंबीयांना फूड किट्सचे वितरण करण्यात आले होते. हुडकेश्वर पोलिसांच्या मदतीने गरजूपर्यंत ही मदत पोहचविण्यात आली. या कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या लोककल्याण समिती नागपूरतर्फे सांझज्योत परिवाराला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
2017 पासून रस्त्यावर वेदनादायी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक हिवाळ्याआधी ब्लांकेट्स आणि सॉक्स समर्पनाद्वारे सांझज्योत कार्यरत आहे. त्याच जबाबदारीला सामोरे ठेऊन, ४ डिसेंबर २०२१ च्या रात्री छोट्या ताजबागपासून सुरुवात करत राजाबक्षा मंदिर, तुकडोजी चौक, गणेशपेठ बस स्टँड, शनी मंदिर, मिठा निम दर्गा, RBl चौक, बर्डी पूल, रेल्वे स्टेशन आणि यशवंत स्टेडियम असा मुख्य भाग आणि रस्त्याच्या बाजूला असलेले प्रत्येक गरजू व्यक्तीला ब्लांकेट्स आणि सॉक्स देऊन आपले जबाबदारीचे कार्य पूर्ण केलेत. यासोबतच पाणी जनजागरण पथनाट्य, हुडकेश्वर पोलिसांचा सन्मान सोहळा, शिव-शाहिरीद्वारे इतिहास दर्शन, अनाथ आश्रम, लहान मुलांच्या मूकबधिर शाळा आणि वृद्ध आश्रम अशा ठिकाणी शक्य तेवढी मदत आपलं ऑफिस आणि आपला व्यवसाय सांभाळून सांझज्योत परिवार सतत करत राहतो. अशीच मोठे कार्य करण्याची मनीषा सांझज्योत दर्शवली आहे.
सांझज्योत परिवाराचे प्रमुख अमोल जुंबळे, सहप्रमुख केतन करींगवार, वित्त प्रमुख चेतन करींगवार, सहवित्त प्रमुख राहुल सूनकरवार, प्रसिद्धी विभाग आनंद गायकवाड, मोहन आंबूलकर आणि सुनील नवघरे तसेच लेखा विभाग मनोज कावळे, संदीप माळवे, राम घरजोडे आणि जिमी चावला तसेच नागपूरच्या बाहेरची सांझज्योतची जबाबदारी नीलेश कुलकर्णी (जर्मनी) व पुष्कर पांडे (दिल्ली), महिला विभाग प्रिया सरोदे, पल्लवी श्रीसागर, रोहिणी करींगवार, मोना जुंबळे, सोनाली भोयर आणि शेवटी ज्येष्ठ मार्गदर्शक कुशल अणे आणि मनीष शहाणे असेच तब्बल शंभर सदस्यांसोबत सांझज्योत ही सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. ज्यामधील प्रत्येक कार्यकर्ता हा सांझज्योत परिवाराचा आत्मा आहे.