नागपूर : मध्यवर्ती स्थानकातून आज आठ बसेस धावल्या. चालक-वाहक कामावर न आल्यानं ही जबाबदारी तपासणी अधिकारी-वाहतूक नियंत्रक यांच्याकडं सोपविण्यात आली. आज 510 प्रवाशांनी बसनं प्रवास केला. काटोल, रामटेक, सावनेर, कळमेश्वर, उमरेड आणि भंडारा या मार्गांवर या एसटी बसगाड्या धावल्या. यातून महिनाभरानंतर गणेशपेठ आगाराला 22 हजार रुपयांचा महसूल मिळाला.
गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर ते ठाम आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर रुजू झाले. नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानकावरून आठ बसेस निघाल्या. तपासणी अधिकारी, वाहतूक नियंत्रक, आरक्षण खिडकी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चालक आणि वाहकांची जबाबदारी देण्यात आली. एस कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्यानं इतर कर्मचाऱ्यांना बसगाड्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना पूर्ण झाला. पण, हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन बस सोडण्यात आल्या. पण, त्यामध्ये नियमित वाहक आणि चालक सहभागी झाले नव्हते. गेल्या महिनाभरानंतर या दोन बसेस सोडण्यात आल्या होत्या. पण, कर्मचारी कामावर आले नव्हते. 400 च्या वर कर्माचाऱ्यांचे नागपूर विभागात निलंबन करण्यात आलं. तरीही कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
सहा नोव्हेंबर रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी नागपुरातून संप पुकारला होता. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बस बंद असल्यामुळं बसनं प्रवास करणारे विद्यार्थी शाळेत पोहचू शकत नाहीत. प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही हाल आहेत. हे मान्य करतो. पण, आमची आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे, असं कर्मचारी संघटनेचं म्हणण आहे.
परिवहन मंत्र्यांनी दिलेली पगारवाढ ही तुकड्यांमध्ये असल्यानं कर्मचारी नाराज आहेत. दिलेली वाढ ही अत्यंत कमी आहे. सेवा देणाऱ्या वरिष्ठांना योग्य प्रमाणात पगारवाढ झाली नसल्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच म्हणणंय. वाहतूक निरीक्षकांना मशीन देण्यात आली. त्यामुळं त्या दोन बसेस सुरू झाल्या. विलीनीकरण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण, योग्य प्रमाणात पगारवाढ मिळावं, अशीच कर्मचाऱ्यांची मागणी आहे.