Nagpur Corona | वडिलांचा कोरोनामुळं ऑक्सिजनअभावी मृत्यू, मुलांनी जयंतीदिनी घालून दिला नवा आदर्श!

| Updated on: Dec 25, 2021 | 11:22 AM

वडिलांच्या जयंतीला प्रशासनाला ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना पीडित मिश्रा कुटुंबाकडून सामाजिक दायित्वाचा परिचय देण्यात आलाय.

Nagpur Corona | वडिलांचा कोरोनामुळं ऑक्सिजनअभावी मृत्यू, मुलांनी जयंतीदिनी घालून दिला नवा आदर्श!
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : मावळत्या वर्षात एप्रिल महिन्यात वडील गमावलेल्या मिश्रा कुटुंबाने सामाजिक दायित्व दाखवत जिल्हा प्रशासनाला सात हजार लिटरचे ऑक्सिजन सिलिंडर बहाल केले. संपूर्ण कुटुंबाने जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडं अन्य कुटुंबीयांना वैद्यकीय आणिबाणीत हा त्रास होऊ नये, यासाठी हे सिलिंडर प्रशासनाला दिले असल्याचे स्पष्ट केले.

 

सात हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन

गेल्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या कोरोना लाटेत अनेकांना आपल्या जिवलगांना गमवावे लागले. ऑक्सिजन बेडची उपलब्धता नसताना शेकडो नागरिकांना दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अचानक रुग्ण वाढ झाल्यामुळे तात्काळ आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले होते. अशावेळी अनेकांनी खासगी स्वरूपातही काही व्यवस्था घरी केली. मोठया प्रमाणात सिंलेंडर खरेदी व्यक्तिगतरित्या केली आहे. भविष्यामध्ये अशा पद्धतीची स्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी मिश्रा कुटुंबीयांनी सात हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन सिलिंडर आरोग्य यंत्रणेला बहाल केले.

नातेवाईकांनी घेतला निर्णय

गेल्या वर्षी 24 एप्रिल रोजी सुरेंद्र रामप्रसाद मिश्रा या 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे ऑक्सिजन सुविधेअभावी कोरोनामध्ये निधन झाले. 24 डिसेंबर हा त्यांचा पहिला जयंती दिवस. या जयंती दिवसाला, पत्नी श्रीमती गीता सुरेंद्र मिश्रा, पुत्र प्रशांत व शिव, मुलगी शामा संजय त्रिवेदी, नातेवाईक प्रभू अवस्ती, संजय त्रिवेदी यांनी जिल्हाधिकारी आर. विमला यांची भेट घेऊन वडिलांच्या जयंतीदिनी सिलिंडर भेद देत असल्याचे सांगितले.

मदतीचे स्वागत आहे

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या सामाजिक दायित्वाचे कौतुक केले. मिश्रा कुटुंबाचे यावेळी त्यांनी सांत्वनही केले. मिश्रा कुटुंबाने यावेळी दान केलेले ऑक्सिजन सिलिंडर ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेत वापरले जाईल, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इनामदार यांनी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे सिलिंडर असणाऱ्या नागरिकांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यास ते स्वीकारले जातील, असे स्पष्ट केले. सात हजार लिटर क्षमतेचे सिलिंडर आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यकतेनुसार वापरण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे यासाठी नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nagpur Crime | दाभा, बेलतरोडीत दरोडेखोरांचा धुमाकूळ, पोलिसांची उडविली होती झोप; सराफा व्यवसायिकासह सात जणांना अटक

20 दिवसांत सात आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. ही आंतरराज्यीय टोळी असल्यानं आरोपींना अटक करण्यास वेळ लागला.

प्रातिनिधीक फोटो

नागपूर : दाभा, बेलतरोडी हद्दीत दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. तीन-चार घरी दरोडा पडल्यानं पोलिसांची झोप उडाली होती. तपासाचे चक्र फिरवत त्यांनी 20 दिवसांत सात आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. ही आंतरराज्यीय टोळी असल्यानं आरोपींना अटक करण्यात वेळ लागला.

 

असा लागला आरोपींचा शोध

दाभा, बेलतरोडीत दरोड्याच्या घटना वाढल्या होत्या. तीन डिसेंबरला अनिता मेश्राम यांच्याकडे घरफोडी झाली. दहा डिसेंबरला मंगेश वांद्रे यांच्याकडे दरोडा पडला. त्यामुळं पोलिसांची तारांबळ उडाली. सीसीटीव्हीची आधार घेण्यात आला. दरोडेखोर रामझुला, संविधान चौकाच्या फुटपाथवर राहत होते. तिथंच त्यांनी हिस्सेवाटप केले होते. चंगीराम नावाचा आरोपी तिथंच वास्तव्यास असल्याचं दिसत होतं. याचा धागा पकडून मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात छापेमारी करण्यात आली.

 

अटकेतील आरोपी

अलाहाबाद गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. तिथल्या पारधी बेड्यावर छापा मारण्यात आला. रायसेनजवळील गुलगाव सांचीचा मोंग्या चंगीराम गोसाई (वय 21), माणिकपूरचा निर्मल रोशनलाल मोंग्या (वय 20), चित्रकूटचा रोहित भगत (वय 24), विदिशाजवळील धामरमुडा येथील पिंट्या मोंग्या अशा आरोपींना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची विल्हेवाट लावणारे गोधनीचे सराफा व्यापारी प्रवीण कानोले त्यांचा नोकर संदेश रोकडे तसेच बोलेरोचालक कपीलनगरचा हरी श्रीराम आसोले यांना अटक करण्यात आली. या टोळीविरुद्ध अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत.

 

यांनी केली कामगिरी

पोलिसांनी या टोळीकडून आठ मोबाईल, बोलेरो पिकअप जप्त केली. मुख्य आरोपी चंगीराम व त्याचे साथीदार फरार आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त चिन्मय पंडित, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहायक निरीक्षक मयूर चौरसिया, गणेश पवार, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, लक्ष्मीछाया तांबूसकर, कर्मचारी संतोष मदनकर, राजेश तिवारी, आशीष ठाकरे आदींनी ही कामगिरी बजावली.

NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!

Nagpur Crime | जीवन नकोसे झाले! विष घेऊन गळफास; 20 दिवस व्हेंटिलेटवर तरीही तुटली नाही आयुष्याची दोरी

Nagpur | सामूहिक बलात्कार प्रकरण : अडीच महिन्यांपासून आरोपी फरार; कसे आले पोलिसांच्या जाळ्यात?