Nagpur | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जाणून घ्या आज संविधानाची फलनिष्पत्ती माजी सनदी अधिकाऱ्यांकडून

| Updated on: Dec 16, 2021 | 6:25 AM

भारतीय संविधान, त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास, भारतीय संविधानाचे वेगळेपण, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, लोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभांची संविधानिक जबाबदारी, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. खोब्रागडे या कार्यक्रमातून देणार आहेत.

Nagpur | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जाणून घ्या आज संविधानाची फलनिष्पत्ती माजी सनदी अधिकाऱ्यांकडून
ई. झेड. खोब्रागडे, माजी सनदी अधिकारी.
Follow us on

नागपूर : आपण देशाचा 75 वा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत. संविधानाची (Constitution) काय फलनिष्पत्ती झाली. तसेच स्वातंत्र्योत्तर भारत यासंदर्भात तुम्हाला माजी सनदी अधिकारी आज सायंकाळी चार वाजता मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयाच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

संविधानाबद्दल विचारा प्रश्न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित वेबचर्चा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक ई. झेड. खोब्रागडे (E. Z. Khobragade) यांची संविधानाची फलनिष्पती व स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत https://youtu.be/SpqrqlzNBXY या मोबाईल लिंकवर गुरुवार 16 डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी 4 वाजता प्रसारित होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. सायंकाळी वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्या तासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल.

मुलभूत अधिकार-कर्तव्य

भारतीय संविधान, त्याची पार्श्वभूमी आणि इतिहास, भारतीय संविधानाचे वेगळेपण, संविधानातील मुलभूत अधिकारांचे वर्णन, लोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभांची संविधानिक जबाबदारी, संविधानातील मुलभूत कर्तव्यांचा समावेश आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. खोब्रागडे या कार्यक्रमातून देणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

क्रीडा स्पर्धांसाठी 24 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

नागपूर : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा विभागातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रशासकीय कार्यालयांनी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले होते. परंतु कमी प्रतिसाद मिळाल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रवेश वाढण्याच्या अनुषंगाने 24 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात येत आहे. सर्व विभाग प्रमुखांनी याची नोंद घ्यावी व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा.

OBC Reservation | सरकारचे अज्ञान, अहंकार आणि प्रचंड दुर्लक्ष नडले; पकंजांची घणाघाती टीका, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

पेपरफुटीनंतर अखेर जाग, आता सर्व परीक्षा MKCL, IBPS, आणि TCS घेणार, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

Obc reservation : ठाकरे सरकारला झटका, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश, पुढची सुनावणी नव्या वर्षात