चोरट्यांनी सरफाची लाखो रुपयांची बॅग पळवली ती पळवली…; पुन्हा त्यांनी केले तर भयानकच…

| Updated on: May 25, 2023 | 9:28 PM

सोनाराची लूट केल्याची माहिती पोलिसांना मिळताच सावनेर पालिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास माहिती घेऊन तपास चालू केला आहे.

चोरट्यांनी सरफाची लाखो रुपयांची बॅग पळवली ती पळवली...; पुन्हा त्यांनी केले तर भयानकच...
Follow us on

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरासह परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीमध्ये बेछूट गोळीबार करत सराफाला लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोऱ्यांनी केलेल्या या लुटीमध्ये 30 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. सावनेर पोलिसांकडून लूटमार करणाऱ्यांचा तपास सुरु केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेबााबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, किशोर वामनराव मर्जिवे (रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) यांचे गावामध्ये किशोर वामनराव मर्जिवे नावाचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे.

त्यामुळे त्यांनी बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानातील दागिने आणि रोख रक्कम बॅगेत ठेवली होती. त्यानंतर दुकान बंद करण्यापूर्वी ती बॅग दुचाकीवर ठेवण्यात आली होती.

त्याचवेळी एका दरोडेखोराने ती बॅग नदीच्या दिशेने पळवून घेऊन गेला. तर त्याच दरोडेखोराचा त्याच्यासोबतच एक साथीदार नदीच्या काठावर, तर दुसरा पात्रात उभा होता.

रोख रक्कम किशोर मर्जिवे यांनी आरडाओरड केला. त्यांच्या आरडाओरड ऐकून नागरिकांनीही त्या दरोडेखोरांचा पाठलागही केला. मात्र, त्या दरोडेखोरांनी नागरिकांच्या दिशेने गोळीबार केला.

त्यातच नदीपात्रातील अंधाराचा फायदा घेत त्यांनी पळ काढला. सोनाराच्या त्या बॅगमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 30 लाख रुपयांचा ऐवज असल्याची माहिती मर्जिवे यांनी पोलिसांना दिली.

सोनाराची लूट केल्याची माहिती पोलिसांना मिळताच सावनेर पालिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास माहिती घेऊन तपास चालू केला आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पाटणसावंगी येथे पोलिसांनी तळ ठोकला आहे.