नागपुरात सोन्याच्या भावात घट, जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे भाव

| Updated on: Nov 25, 2021 | 4:20 PM

शहरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव एका तोड्याला ४६ हजार ६२० रुपये आहे. काल हाच भाव ४६ हजार ६३० रुपये होता. दहा रुपये प्रतितोळा भाव कमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या भावात उतार दिसून आला.

नागपुरात सोन्याच्या भावात घट, जाणून घ्या आजचे सोन्याचांदीचे भाव
Gold
Follow us on

नागपूर : शहरात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव एका तोड्याला ४७ हजार ६२० रुपये आहे. काल हाच भाव ४७ हजार ६३० रुपये होता. याचा अर्थ १० रुपये एका तोड्याला भाव कमी झाला. चांदीच्या भावात मात्र वाढ होताना दिसून आली.

शहरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव एका तोड्याला ४६ हजार ६२० रुपये आहे. काल हाच भाव ४६ हजार ६३० रुपये होता. दहा रुपये प्रतितोळा भाव कमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या भावात उतार दिसून आला. ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या भावात वाढ झाली होती. ९ ऑक्टोबर रोजी ४८ हजार २७० रुपये २४ कॅरेट सोन्याचा भाव होता. तर एक ऑक्टोबर रोजी सर्वात कमी म्हणजे ४६ हजार ४७० रुपये प्रती तोळा सोन्याचा भाव होता.

नागपुरात लोक बटुकभाई सन्स ज्वेलर्स, साठे ज्वेलर्स, करण कोठारी ज्वेलर्स, श्री कृष्ण ज्वेलर्स, दास ज्वेलर्स, रोकडे ज्वेलर्स, केतकर मोतीवाले, खंडेलवार ज्वेलर्स, पी. एन. गाडगीड ज्वेलर्स या ठिकाणांहून खरेदी करतात.

महाराष्ट्रीय पद्धतीच्या दागिन्यांनाच पसंती

नागपुरात चांदीचे भाव आज ६२ हजार ९०० रुपये प्रतिकिलो आहे. काल हेच भाव ६२ हजार ७०० रुपये होते. याचा अर्थ चांदीच्या भावात २०० रुपये प्रतिकिलो वाढ दिसून आली. जीएसटी व अन्य कर अतिरिक्त आहेत. चांदीचा वापर पैजण आणि अंगठी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मध्य भारतातील नागपूर शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. पण, येथे सोन्याची मागणी काही कमी नाही. सोन्याची मागणी नागपुरात काही वर्षांपासून वाढत आहे. लोक येथे मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. महाराष्ट्रीयन पद्धतीनं बनविलेल्या सोन्याला येथे पसंती दिली जाते.

नागपुरातील आजचे भाव

२४ कॅरेट सोने ४७ हजार ६२० रुपये
२२ कॅरेट सोने ४६ हजार ६२० रुपये
चांदी ६२ हजार ९०० रुपये

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

बायोडिझेल साठ्यावर पोलिसांची धाड, नांद्यात अघीन ट्रान्सपोर्टच्या आवारात हेराफेरी