Maratha Reservation | OBC मधील जातींना मराठा समाजात दाखवून आरक्षण कसं देता?बबनराव तायवाडेंचा सवाल

| Updated on: Nov 08, 2023 | 1:27 PM

Maratha Reservation | तुम्ही मराठा जातीचा अभ्यास करणार की, मराठा समाजाचा? हे सरकारने स्पष्ट करावं. गायकवाड आयोगाने 2018 मध्ये मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समाजाचा अभ्यास केला. "ज्या जाती आधीपासून ओबीसीत आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही पुन्हा कसा करु शकता" असा सवाल तायवाडेंनी विचारला.

Maratha Reservation | OBC मधील जातींना मराठा समाजात दाखवून आरक्षण कसं देता?बबनराव तायवाडेंचा सवाल
babanrao taywade
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर (स्वप्निल उमाटे) : “महाराष्ट्रातील OBC एकवटलेला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ओबीसींचे मोर्चे, सभा होतील, त्याठिकाणी ओबीसी जाणार. ओबीसी आपल्या एकजुटीचा संदेश देणार” असं बबनराव तायवाडे म्हणाले. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. “ओबीसीला आपल्या संवैधानिक अधिकाराच रक्षण करायच आहे. गायकवाड आयोगाने जो अहवाल 2018 मध्ये सादर केला होता. त्यामध्ये मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समाजाचा अभ्यास केला. मराठा समाजात मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या सर्व जातींचां समावेश करुन अभ्यास केला” असं बबनराव तायवाडे म्हणाले.

“या सर्व जातीचा अभ्यास करुन सांगितलं, की यांची लोकसंख्या जवळ 30 टक्के येते. गायकवाड आयोगाने तेव्हाच स्पष्ट केलं की, देशात 50 टक्क्यांची मर्यादा घालून दिलेली आहे. ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. म्हणून स्वतंत्र एसीबीसी, 15-4, 16-4 नुसार कॅटेगरी तयार करुन त्यातून आरक्षण देण्यात यावं. त्या प्रकारे सरकारने 16 टक्के आरक्षण दिलं ते उच्च न्यायलसय 12-13 टक्के कायम झालं. पण सर्वोच्च न्यायालायने नाकारलं” असं बबनराव तायवाडे म्हणाले.

OBC जातीचा मराठा समाजात समावेश करुन आरक्षण

“सरकारला आरक्षण मराठा जातीला द्यायचं आहे की, मराठा समाजाला. कारण त्यांनी मराठा समाजात सहा-सात जातींचा समावेश केला. त्यापैकी कुणबी, कुणबी-मराठा लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या जाती आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या दोन जातीचा 2004 मध्ये समावेश केला. सहा जाती ज्या आधीपासून ओबीसीमध्ये आहेत. त्या जातीचा मराठा समाजात समावेश करुन लोकंसख्या 30 टक्के दाखवली. त्या 30 टक्के लोकंख्येला आरक्षण देण्याची आयोगाने शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशीवरुन 16 टक्के आरक्षण देण्यात आलं” असं बबनराव तायवडे म्हणाले.

‘त्या जातींचा अभ्यास तुम्ही पुन्हा कसा करु शकता’

“ज्या जाती आधीपासून ओबीसीमध्ये आहेत, त्या जातींचा मराठा समाजाला आरक्षण देताना तुम्ही कसा समावेश करु शकता? हा कायदेशीर प्रश्न येतो. या संदर्भात आम्ही राज्य सरकार आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला निवेदन देणार आहोत. आता नव्याने अभ्यास करणार त्यावेळी मराठा समाजाचा अभ्यास करणार की मराठा जातीचा?. असा प्रश्न तायवाडे यांनी विचारला. आधीपासून ज्या जाती ओबीसीमध्ये आहेत, त्याचा आरक्षण धोक्यात येऊ शकतं. राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हा विषय देणार आहात. त्यावेळी मराठा जातीचा अभ्यास करा, मराठा समाजाचा नको. ज्या जाती आधीपासून ओबीसीत आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही पुन्हा कसा करु शकता” असा सवाल तायवाडेंनी विचारला.