उत्तर नागपुरातील गुंठेवारी भागात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार, 461 कोटींचा निधी मंजूर

| Updated on: Sep 03, 2021 | 11:31 PM

नागपूर शहरातील मौजे कळमना, चिखली (देव), वांजरा, वांजरी, नारा, नारी, इंदोरा, बिनाकी, जरीपटका व उत्तर नागपूर भागातील गुंठेवारी योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या कामांना टप्याटप्याने निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

उत्तर नागपुरातील गुंठेवारी भागात पायाभूत सुविधा उपलब्ध होणार, 461 कोटींचा निधी मंजूर
Follow us on

नागपूर : नागपूर शहरातील मौजे कळमना, चिखली (देव), वांजरा, वांजरी, नारा, नारी, इंदोरा, बिनाकी, जरीपटका व उत्तर नागपूर भागातील गुंठेवारी योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या कामांना टप्याटप्याने निधी उपलब्ध करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर सुधार प्रन्यासला दिले. यामुळे येथील नागरिकांना रस्ते व पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. (Infrastructure will be available in North Nagpur, Rs 461 crore sanctioned)

नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या भागातील विकास कामांसाठी आग्रही भूमिका घेतली असून त्यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला नागपूर महानगर पालिकेचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे उपस्थित होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून या भागाचा विकास रखडल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत होती. नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नगरविकास खात्याकडे झालेल्या बैठकीत हा विषय लावून धरला. डॉ. राऊत यांचे निवेदन मान्य झाल्याने या भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीस नगर विकास खात्याचे व नागपूर सुधार प्रन्यासचे वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थित होते.

नागपूर शहरातील छिंदवाडा रोड ते कळमना रेल्वे लाइन पर्यंत येणाऱ्या मौजा कळमना, चिखली (देव), वांजरा, वांजरी, नारी, नारा, इंदोरा, बिनाकी, मानकापूर, जरीपटका उत्तर नागपूर क्षेत्राअंतर्गत गुंठेवारी अधिनियमाअंतर्गत नियमित न केलेल्या अभिन्यासात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 344.12 कोटी रुपयांचा प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासतर्फे जिल्हा नियोजन समितीला 13 जानेवारी 2021 रोजी सादर केला होता.

पायाभूत सुविधांसाठी 461 कोटी टप्प्याटप्याने मिळणार

उपरोक्त क्षेत्राअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासतर्फे नियमित करण्यात आलेल्या अभिन्यासातील काही मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 177.67 कोटी निधीची आवश्यकता आहे. याप्रमाणे एकूण 461.78 कोटी रुपये टप्याटप्याने उपलब्ध होणार आहेत. या निधीतून सदर भागातील रस्ते, मलनिस्सारण वाहिनी, जलवाहिनी व इतर कामे करण्यात येतील.

इतर बातम्या

यंदा बाजारात रेखीव बैलजोडी, शिंगही नाजूक पण मजबूत, मागील वर्षी घरी नेईपर्यंत शिंग तुटल्याची ग्राहकांची होती तक्रार

अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच, दिवाणी आणि फौजदारी गुन्हेही दाखल होणार; सोमय्यांचा दावा

इम्पिरीकल डाटा कोण देणार? फडणवीस म्हणतात, राज्य मागासवर्ग आयोग, भुजबळ म्हणतात, आम्ही कोर्टात!

(Infrastructure will be available in North Nagpur, Rs 461 crore sanctioned)