मुंबई: आज दिनांक 19 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. तसेच राज्यातील सत्तांतरानंतरचंही हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बेळगावपासून महापुरुषांच्या अवमानापर्यंतचे अनेक विषय गाजणार असल्याने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनाच्या या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
नागपूर :
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाची बैठक सुरु
नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये बैठक सुरु
राज्य सरकारला कसं घेरायचं या मुद्द्यावर रणनीती आखण्यासाठी बैठक
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जय विदर्भ पक्ष आक्रमक
झिरो माईल मेट्रो स्टेशनसमोर हजारोंच्या संख्येनं एकवटले कार्यकर्ते
नागपुरात पोलीस आणि कार्यकर्ते आले आमनेसामने
भाजप, काँग्रेस सगळ्यांनी तोंडाला पाने पुसल्याचा आरोप
विदर्भातील खनिज संपत्ती लुटण्याचे काम होत असल्याचा आरोप
आज सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक
नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलात होणार बैठक
रेडिसन ब्ल्यू हॉटेलात उद्धव ठाकरे यांचा मुक्काम
अधिवेशनासाठी ठाकरे गटाची व्यूहरचना ठरवण्यासाठी बैठक
दिवा डंपिंग ग्राउंड विरोधात दिवा शहर भाजप आक्रमक
दिव्यातील डंपिंग ग्राउंड रस्ता रोको आंदोलन भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू
गेले अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या डंपिंग ग्राउंड स्थलांतरावरून आक्रमक
खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला महामेळाव्याचा मुद्दा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली होती, ती ऐनवेळी नाकारली
केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं, खासदार अरविंद सावंत यांची मागणी
दोन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची बैठक झाल्यानंतरही सीमाभागात मराठी लोकांवर अत्याचार – खासदार सावंत
खोपोलीत कंटेनरची खासगी बसला धडक
अपघातात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी
बसमध्ये होते 35 प्रवाशी
लग्नसमारंभासाठी गेली होती बस
Maharashtra | One dead, 10 injured in a collision between a private bus and a container vehicle in Khopoli of Raigad. The bus was returning from a wedding ceremony and was carrying 35 passengers: Raigad Police pic.twitter.com/HYaPZY3NO7
— ANI (@ANI) December 19, 2022
पुण्यात आज एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन
विद्यार्थ्यांना पोलिसांनी पाठवल्या नोटीसा
अहिल्या शिक्षण संस्थेच्या बाहेर करणार आंदोलन
सकाळपासूनच पोलिसांनी लावला बंदोबस्त
विद्यार्थ्यांना नोटीसा पाठवत पोलिसांचा इशारा
घोषणाबाजी करत सरकारला विद्यार्थ्यांची मागण्या मान्य करण्याची मागणी
पुणे पोलिसांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर परवानगी
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात आघाडीच्या नेत्यांची कर्नाटकाकडे कूच
आघाडीच्या नेत्यांना बॉर्डरवरच रोखलं
आघाडीचे नेते पोलिसांच्या ताब्यात, अनेकांची धरपकड
पंढरपूर बंदच्या मोर्चामध्ये कॉरिडॉर समर्थनाच्या घोषणा
मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा न दिल्याने आंदोलनकर्त्यांच्या कॉरिडॉरच्या समर्थनार्थ घोषणा
मोर्चेकरी मंदिर परिसरामध्ये जाऊन बंद करण्याचं आवाहन करणार
तिकीट मागितले म्हणून संतप्त प्रवाशाने मानेवर वार केल्याची प्राथमिक माहिती
सुनील गुप्ता असे जखमी टीसी चे नाव असून कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत
विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या
50 खोके, एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला
विरोधकांच्या हातात बॅनर्स घेऊन घोषणा
सकाळी 11 : विधानसभा कामकाज
दुपारी 12 : विधानपरिषद कामकाज
दुपारी 4.30 : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा सत्कार, सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर
सायं 5 : भाजपा प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष बैठक, हॉटेल अशोका, लक्ष्मीनगर, नागपूर
विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं पत्र
एमपीएससी परीक्षेचा युपीएससीच्या धर्तीवर घेतलेला निर्णय 2025 पासून लागू करा
विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली मागणी
माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह बेळगावला जाण्याच्या तयारीत
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त
महाविकास आघाडीच्या नेत्यांना सीमेवरच रोखलं जाणार
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जाण्याच्या प्रयत्नात
मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक सरकारने नाकारलाय प्रवेश
उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता नागपूरला येणार
उद्धव ठाकरे घेणार हिवाळी अधिवेशनात भाग
दोन दिवस कामकाजात भाग घेणार
हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणार
अधिविेशनात महापुरुषांचा अपमान, शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवर चर्चा होणार
अधिवेशनात सीमावादावरही चर्चा होणार
नागपूरात 7 हजार पोलीस असणार तैनात
मोर्चांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॅाच
2900 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॅाच
सोशल मीडिया पेट्रोलिंगवरंही पोलीसांचा भर
विधानभवनावर धडकणाऱ्या या मोर्चाच्या सुरक्षेच्या नियोजनाचा आढावा काल नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला
विधानभवनावर धडकणारे मोठे मोर्चे झिरो माईल् स्टेशन येथे रोखण्यात येणार असून या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे
सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले असून कशा पद्धतीने पूर्ण सुरक्षा यंत्रणा असेल याची पाहणी पोलीस आयुक्तांनी केली
विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्यांकरिता मेट्रो परिसरात महिलांच्या प्रसाधन आणि आरामाची व्यवस्था करण्यात आली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे
पहिल्याच दिवसापासून विरोधक सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत
विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर टाकला होता बहिष्कार