नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या (Divisional Sports Complex at Mankapur) मैदानावर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत एरोमोडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मानकापूर स्टेडियम सज्ज झाले आहे. जवळपास पाच हजार मुलांच्या उपस्थित पंचवीस ते तीस विमानांचे करतब बघायला मिळणार आहे. यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Youth Welfare Minister Sunil Kedar) यांनी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथून त्यांनी सर्व यंत्रणेचा आढावा घेतला. रविवारी सात ते दहा या काळात हा सोहळा मानकापूर येथील क्रीडा संकुलात (Planning of Sports Department) होणार आहे. संपूर्ण सोहळा दहा वाजताच्या आतमध्ये पूर्ण करण्याचे क्रीडा विभागाचे नियोजन आहे. या सोहळ्याला येणाऱ्या सर्व मुलांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकांसाठीदेखील खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मानकापूर येथील व्हीआयपी गेट क्रमांक एक या ठिकाणावरून सर्व मान्यवरांना प्रवेश दिला जाणार आहे. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही याच गेट नंबर एकमधून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना गेट नंबर दोन येथून प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थी व पालकांनी गेट नंबर 2 मधून प्रवेश करावा असे आवाहन करण्यात आले आहे. हा सोहळा लाईव्ह केला जाणार आहे. या संदर्भातील सोशल माध्यमांची लिंक जाहीर केली जाणार आहे. तसेच स्थानिक केबल नेटवर्कवर लाईव्ह दाखविला जाणार आहे. एरोमोडेलिंग शो बघायला येणार्या मुलांसाठी खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांना याठिकाणी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने शाळकरी मुले या ठिकाणी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 30 विमानांचे आकाशातून पथसंचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण व्हावी. तसेच एरोमोडेलिंग क्षेत्रात आवड निर्माण व्हावी. यासंदर्भातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मुलांपुढे यावी, यासाठी जवळपास आठ ते दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अशा पद्धतीचा शो नागपूर शहरात होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.