नागपूर : नागपूर महापालिका क्षेत्रामधील (Municipal schools) इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे (from one to seven)वर्ग असलेल्या शाळा 1 डिसेंबर 2021 पासून सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवारी 16 डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता. 15) आदेश जारी केले आहेत.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या 116 शाळांसह 1053 खासगी शाळा अशा एकूण 1069 शाळा गुरूवारी (ता. 16) सुरू होतील. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या 1069 प्राथमिक शाळांमध्ये एकूण 2 लाख 49 हजार 715 विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मनपाच्या शाळेमध्ये 9319 विद्यार्थी तर अन्य खासगी शाळांमध्ये 2 लाख 40 हजार 396 एवढी विद्यार्थी संख्य आहे. प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशीपासूनच कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पालन करण्याबाबत आवश्यक उपाययोजनना आखणे आवश्यक आहे.
नागपूर शहरातील शाळा सुरू करताना शाळेमध्ये वर्गात किंवा अन्य परिसरात दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, प्रत्येकाने फेस मास्क/फेस कव्हर वापरणे बंधनकारक, वारंवार हात धुणे आवश्यक करण्यात आले आहे. वर्गामध्ये विद्यार्थीसंख्या जास्त असल्यास दोन पाळीमध्ये शाळा घेणे, एका बाकावर एक विद्यार्थी बसेल अशी व्यवस्था करणे, दोन बाकांमध्ये 6 फुट अंतर असावे, एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत अशी व्यवस्था करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोजचे कोव्हिड लसीकरण आवश्यक आहे. शिंकताना, खोकताना स्वत:चे तोंड व नाक हात रूमाल टिश्यू पेपर अथवा दुमडलेल्या हाताच्या कोपराने झाकावे. वापरलेल्या टिश्यू पेपरची विल्हेवाट आरोग्यदायी रितीने लावण्यात यावी. प्रत्येकाने आपल्या आरोग्याचे स्वत: बारकाईने निरीक्षण करावे आणि कोणतीही लक्षणे किंवा आजार असल्यास वेळेत त्याची माहिती द्यावी व उपचार करून घ्यावे.
शाळा उघडण्यापूर्वी शाळा प्रशासनाद्वारे आवश्यक नियोजन करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या शाळा अजूनही कन्टेन्मेट झोनमध्ये आहे त्या उघडू नये. तसेच जे विद्यार्थी, शिक्षक कन्टेन्मेट झोन क्षेत्रात राहतात त्यांना शाळेत येण्याची अनुमती देऊ नये. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी कन्टेन्मेट झोन क्षेत्रात भेट देऊ नये. अशा सूचना शाळेमार्फत देण्यात याव्यात. पूर्ण शाळेची संपूर्ण स्वच्छता करून घेण्यात यावी. ज्या पृष्ठभागांना वारंवार स्पर्श होतो असे पृष्ठभाग एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने पुसून घ्यावेत. ज्या शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आलेल्या आहेत. त्यांची स्वच्छता विशेष लक्षपूर्वक करण्यात यावी. कोव्हिड-19 चा प्रसार टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमॅट्रिक उपस्थिती पद्धत टाळण्यात यावी. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षात घेऊन खुणा करण्यात याव्यात. मैदानावर, प्रार्थनास्थळी मुलांनी रांगेत व्यवस्थित राहावे यासाठी शारीरिक अंतराचा विषय लक्षात घेऊन खुणा करण्यात याव्यात. हीच पद्धत स्टाफ रूम, ग्रंथालये आदी ठिकाणी सुद्धा वापरण्यात यावी.
शाळेत गर्दी होणारे उपक्रम, खेळ, सामूहिक प्रार्थना टाळावेत. शाळेतील जिमनॅशिय वापरताना देखील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. जलतरण तलाव वापरू नये. ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिजोखमीचे आजार आहेत किंवा ज्या महिला कर्मचारी, शिक्षिका गरोदर आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फेसमास्क, फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायजर, एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. याशिवाय शाळा सुरू झाल्यानंतर ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्ती जसे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आदींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्याची अनुमती देण्यात यावी. शाळेमध्ये दर्शनी भागात कोव्हिड प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे.
इतर बातम्या