नागपूर : राज्यात कोरोना लसीकरण मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूरकर सज्ज झाले आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाकडून मातांच्या कोरोना लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांना मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात याबाबतचा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. (Nagpur District priority to Corona vaccination of 2 lakh 14 thousand mothers)
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज्ज
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर प्रशासन सज्ज झालं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नागपूर जिल्ह्यातील शून्य ते तेरा या वयोगटातील बालकांच्या मातांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे तेरा वर्षांपर्यंतची मुलं प्रभावित झाल्यास त्यांच्या देखभालीकरिता मदत होणार आहे.
मातांना प्राधान्याने लसीकरण
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तेरा वर्षे वयोगटातील बालकांच्या मातांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात निश्चित करण्यात आलेल्या दोन लाख 14 हजार बालकांच्या मातांना प्राधान्याने लस देणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
नागपुरात महिलांचेही मोठ्या प्रमाणात लसीकरण
नागपूर जिल्ह्यात पुरुषांबरोबरच महिलांचेही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. नागपूर जिल्ह्यात 8 लाख 8 हजार 919 महिलांचे लसीकरण झाले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 18 लाख 41 हजार 904 नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये 14 लाख 15 हजार 505 नागरिकांनी पहिला डोस, तर 4 लाख 26 हजार 399 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
दरम्यान राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शून्य ते तेरा वयोगटातील मुलांच्या मातांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.
भाजपचे कार्यकर्ते पुन्हा शिवसेना भवनावर धडकण्याची शक्यता; शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्तhttps://t.co/qHCvpclHqE #Shivsena #ShivajiPark
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 10, 2021
(Nagpur District priority to Corona vaccination of 2 lakh 14 thousand mothers)
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत लसीकरणाला गती, तृतीयपंथियांसाठी विशेष लसीकरण सत्र
नागपूर पोलिसांना कडक सॅल्यूट, चोरीला गेलेले 116 मोबाईल केले परत