नागपूरच्या नाट्यरसिकांसाठी पर्वणी! खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन, थेट मोबाईलवर प्रक्षेपण

| Updated on: Oct 29, 2021 | 10:25 AM

खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती,नागपूर तर्फे आजपासून नागपूरात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. गुरुवारपासून 3 दिवस चालणाऱ्या या खासदार करंडक एकांकिका स्पर्धेत एकूण 24 एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

नागपूरच्या नाट्यरसिकांसाठी पर्वणी! खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन, थेट मोबाईलवर प्रक्षेपण
नागपूर एकांकिका स्पर्धा उद्घाटन
Follow us on

नागपूर: खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती,नागपूर तर्फे आजपासून नागपूरात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. गुरुवारपासून 3 दिवस चालणाऱ्या या खासदार करंडक एकांकिका स्पर्धेत एकूण 24 एकांकिकांचे सादरीकरण होणार असून , यामधून जवळपास 500 हून अधिक रंगकर्मींचा कलाविष्कार नाट्य रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. कोरोना नंतर हा रसिकांसाठी मोठा अनुभव ठरणार आहे

नितीन गडकरींच्या संकल्पनेतून स्पर्धेचं आयोजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नाने नागपूरमध्ये दरवर्षी ‘खासदार करंडक’ स्पर्धांचे आयोजन केले जाते. याअंतर्गत यंदा नागपूरात एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी आणि संस्कार भारती च्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांच्याहस्ते आज नागपूरात करण्यात आले . यावेळी अनेक जेष्ठ कलावंत,रंगकर्मी उपस्थित होते.

500 रंगकर्मींचा सहभाग

लक्ष्मी नगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कांचनताई गडकरी यांचा हस्ते दिप प्रज्वलन करून एकांकिका स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. 3 दिवस चालणाऱ्या या खासदार करंडक एकांकिका स्पर्धेत एकूण 24 एकांकिकांचे सादरीकरण होणार असून , यामधून जवळपास 500 हून अधिक रंगकर्मींचा कलाविष्कार नाट्य रसिकांना पाहण्यास मिळणार आहे.

नागपूर येथे आज 28, 29 व 30 ऑक्टोबर रोजी सादर होणाऱ्या या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभाचे ओटीटी व्यासपीठावरून जगभरात थेट प्रक्षेपण केले जात असून, यासाठी ‘अबास मीडिया’ या समूहाच्या ‘स्टेज टू स्क्रीन’ या संकल्पनेवर आधारित तयार केलेल्या ‘प्लेक्सिगो’ ह्या ॲपद्वारे हे प्रक्षेपण केले जात आहे.

इतर बातम्या:

‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखा, सोशल मीडियावरील भावनिक बाजारापासून सावधान

अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणमुळे रब्बी हंगाम धोक्यात! आम्ही कसं जगायचं? शेतकऱ्यांचा सवाल

Nagpur one act play competition organised three days peoples of nagpur have great chance of entertainment