नागपूर: महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गेल्या आठवड्यात नागपूरच्या दौऱ्यावर होते. दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्यानंतर नागपूर पोलीस दल अॅक्शनमोडमध्ये आलं आहे. पोलिसांनी आठवडाभरात गुन्हेगारांविरोधात तीन मोठ्या मोहिमा राबवत 100 गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये क्रिकेट बुकी, अमली पदार्थ, अवैध शस्र विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
गृहमंत्री दिलीप वळले पाटील यांनी गेल्या आठवड्यात नागपुरातली गुन्हेगारीचा आढावा घेतल्यानंतर, नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आठवडाभरात तीन मोठ्या मोहिम राबवून, पोलीसांचा धडक कारवाई सुरु केलीय. सुरुवातीला पोलिसांनी क्रिकेट बुकी विरोधात मोठी मोहिम राबवली. भारत-पाकिस्तान टी ट्विटी सामन्यावर कोट्यावधींच्या सट्ट्यादरम्यान पोलिसांनी 19 ठिकाणी पोलिसांचा छापे टाकले. अनेकांना ताब्यात घेतलं, त्यानंतर अमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केलीय. यात सहा तासांत पोलिसांनी तब्बल 66 आरोपींना ताब्यात घेतलं आणि एक लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मुंबईत NCB च्या कारवाईवरुन अमली पदार्थ तस्करीचा मुद्दा गाजतोय, तर इकडे नागपूर पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात धडक कारवाई सुरु केलीय. त्यानंतर नागपूर पोलिसांनी आपला मोर्चा अवैध शस्त्र वापरणाऱ्यांच्या विरोधात वळवला. या मोहिमेत 30 गुन्हे दाखल झाले असून, 31 गुन्हेगारांकडे धारदार शस्रे आढळली. दिवाळीच्या काळात नागपूरातील गुन्हेगारी वाढू नये, म्हणून पोलिसांनी या मोहिम राबवल्या, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर पोलीस दलाच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर नागपूर पोलीस सक्रिय झाले आहेत. नागपूर पोलिसांनी घेतलेल्या अॅक्शननंतर जिल्ह्यातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी होणार का हे पाहावं लागणार आहे. नागपूरमध्ये पोलीस दलाच्या आक्रमक कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणादणले आहेत.
इतर बातम्या:
VIDEO: क्रांती रेडकरचा संबंध काय?, इथे सर्वच मराठी; संजय राऊत यांचा सवाल
Nagpur Police take action against criminals 100 accused arrested within week