नागपूर : राज्यात कोरोना लसीकरणाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमेनेही चांगलाच वेग धरला आहे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. नागपुरात एकाच दिवस तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच नागपुरात लसीकरणाचा विक्रम पाहायला मिळत आहे. (Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated in the district on the same day)
नागपुरात लसीकरणाला तुफान प्रतिसाद
गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात कालपासून 18 वर्षांवरील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यानंतर काल एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 41 हजार 881 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत हा सर्वाधिक आकडा आहे. विशेष म्हणजे फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल 18 हजार 18 नागरिकांनी लस घेतली. तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 22 हजार 221 नागरिकांनी लस घेतली आहे.
राज्यात 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस
दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद केली आहे. राज्यात काल दिवसभरात 6 लाख 2 हजार 163 नागरिकांना लस देण्यात आली. तर 22 जूनला एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लस देणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
पुणे शहरातही विक्रमी लसीकरण
पुणे शहर जिल्ह्यात काल दिवसभरात 623 केंद्रावर आतापर्यंतचे विक्रमी लसीकरण झाल्याची ‘को विन’ पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल 90 हजार 530 जणांचे लसीकरण करण्यात आले. तसेच काही दिवसांपूर्वी पुण्यात 85 हजारापर्यंत लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे येत्या काही दिवसात पुणेकर एक लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 24 June 2021 https://t.co/MYMWgWKEFW #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2021
(Nagpur Record 42,000 people have been Corona vaccinated in the district on the same day)
संबंधित बातम्या :
Nagpur Vaccination | लशीच्या पुरवठ्याअभावी नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही
नागपूरकरांनी करुन दाखवलं; 130 दिवसानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाबळी नाही